तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

जायकवाडीचे पाणी नागापूरच्या वाण धरणात आणुनपरळी तालुका सुजलाम-सूफलाम करायचा आहे- धनंजय मुंडे
अस्वलांबा, अस्वलांबा तांडा, सोनहिवरा येथील मतदारांशी साधला संवाद


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.08...............रस्ते, वीज, नाल्या, पाणी हे तर लोकप्रतिनिधीचे प्राथमिक कर्तव्य असते, मात्र त्याबरोबरच मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावेल असे कार्य केले पाहीजे. शेतीला पाणी मिळाले तरच शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होवून त्यांच्या जीवनात चांगले दिवस येवू शकतात. त्यासाठीच जायकवाडीचे पाणी वाण धरणात आणुन परळी तालुक्यातील जनतेचे जीवन सुजलाम-सूफलाम करण्याचे काम आपण करणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी तालुक्यातील अस्वलांबा, अस्वलांबा तांडा, सोनहिवरा येथील मतदारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नेते दत्ताआबा पाटील, कृ.उ.बा.समितीचे सभापती अ‍ॅड.गोविंद फड, पं.स.सभापती मोहनराव सोळंके, कृ.उ.बा.समिती माजी सभापती सुर्यभान नाना मुंडे, रा.काँ.युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, भागवत मुंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सततच्या दुष्काळामुळे नागापूरचे वाण धरण कोरडे पडत आहे. वाण धरणाची उंची वाढवून जायकवाडीचे पाणी त्यात आणल्यास संपूर्ण तालुका सिंचनाखाली येवून शेतकर्‍यांचे जीवनमान बदलू शकते. आपले हे स्वप्न असून, मतदारांनी संधी दिल्यास ते नक्की पूर्ण करून दाखवू असा शब्द त्यांनी दिला. राज्यात 5 वर्ष सत्तेत असतानाही इथल्या आमदाराला हे काम करता आले नाही, त्यामुळे आता पुन्हा त्यांना निवडून देण्याची चूक करू नका, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.
यावेळी महादेव मुळे, शिवाजी सोळंके, रखमाजी ढाकणे, राजेभाऊ ढाकणे, उत्तम ढाकणे, सोपान बाबा काचगुंडे, श्रीकृष्ण ढाकणे, किशोर जोगदंड, बालासाहेब गुट्टे, नवनाथ जाधव, वाल्मिक जाधव, अरूण मुंडे, डॉ.राहुल मुंडे, मोहन मुंडे, दिलीप मुंडे, निवृत्ती ढाकणे, निलेश ढाकणे, विनायक काचगुंडे, दिगंबर काचगुंडे, बलभिम ढाकणे, अशोक ढाकणे, अशोक भताने, व्यंकटी भताने, बंकटी ढाकणे, रमेश ढाकणे, अंगद कांदे, रसूल शेख, नितीन ढाकणे, इस्माईल शेख, चैतन्य गुट्टे, उमाकांत काचगुंडे, बाबासाहेब कांदे, विजय गुट्टे, बिभीषण ढाकणे, किशन ढाकणे, गणपत मुंडे, मोहन तुळशीराम मुंडे, रामकिसन मुंडे, रामदास मुंडे, नरहरी मुंडे, संजय मुंडे, ज्ञानदेव शेप, हनुमंत मुंडे, भास्कर मुंडे, जालिंदर बनसोडे, दत्ता मुंडे, मुरलीधर मुंडे, सुनिल नागरगोजे, जीवराज मुंडे, रामराव मुंडे, यादव मोठे, अनिल शेप, सुरेश मुंडे, प्रविण मुंडे, बळीराम मुंडे, हरीराम डोईफोडे, परशुराम मुंडे, गुणेबा पवार, हरिश्चंद्र मुंडे, नामदेव मुंडे, सतिश मुंडे, हनुमंत नागरगोजे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment