तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

पंकजाताईंच्या विजयात मताधिक्याचे योगदान देण्याचा तळेगाव ग्रामस्थांचा निर्धार ; खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रचार फेरीने तळेगाव भाजपमय
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-दि.१०----राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री तथा महायुतीच्या उमेदवार ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ तळेगाव ता.परळी येथे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी प्रचार फेरीत सहभागी होऊन मतदारांशी संवाद साधला.मतदार संघाच्या विकासाचे पर्व अविरत सुरु ठेवण्यासाठी ना.पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी आशीर्वाद उभे करून पंकजाताईंच्या विजयात मतदान रुपी योगदान देण्याचा निर्धार तळेगावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केला.

जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त तळेगाव येथील प्रचार फेरीत सहभागी होऊन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी मतदारांशी संवाद साधला.ना.पंकजाताई मुंडे यांनी मतदार संघाचा न भूतो स्वरूपाचा विकास केला असून भौतिक विकासा सोबत सामाजिक  बांधिलकी जपणाऱ्या संवेदनशील  नेतृत्वाला मतदार मोठ्या प्रमाणात मतदान रुपी आशीर्वाद देऊन विजयी करतील असा विश्वास खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला.याप्रसंगी ठिकठिकाणी महिलांनी खा.प्रितमताईंचे औक्षण करून स्वागत केले.

प्रचार फेरीत भाजप तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे,त्रिंबक तांबडे,श्रीराम मुंडे,रवी कांदे,संजय मुंडे,श्रीराम अण्णा मुंडे,भीमराव मुंडे,कुंडलिक मुंडे,नर्सिंग सांगळे,नारायन तांबडे,भास्कर मुंडे,पाटलोबा मुंडे,श्रीहरी घुगे,विष्णु तांबडे,किसन मुंडे,बबन गुट्टे,धनराज मुंडे, मुरली पारवे,नामदेव मुंडे,नितीन मुंडे,विष्णू मुंडे,पवन मुंडे,विकी मुंडे,दीपक तांबडे,रवी मुंडे,अविनाश मुंडे,गोविंद मुंडे,विलास सांगळे,बालासाहेब मुंडे, व्यंकट सांगळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a comment