तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

धनंजय मुंडेंना आता राज ठाकरेंचीही साथ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला जाहीर पाठींबापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- संपूर्णपणे धनंजय मुंडेंच्या बाजूने झुकलेल्या परळी विधानसभा निवडणूकीत दिवसेंदिवस त्यांचे पारडे अधिक जड होत चालले असून, आता त्यांना साथ देण्यासाठी राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही पुढे आली असून, आज यापक्षाने धनंजय मुंडे यांना जाहीर पाठींबा व्यक्त केला.

गणेशपार भागात झालेल्या जाहीर सभेस मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहिवाळ, परळी तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष श्रीराम सावंत यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे धनंजय मुंडे यांना पाठींबा जाहीर केला. राज ठाकरे यांच्या आदेशावरून हा पाठींबा देण्यात येत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचाराला माणणार्‍या व परळी मतदारसंघातील मतदारांनी धनंजय मुंडे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

राज ठाकरे आणि धनंजय मुंडे हे स्वतंत्र पक्षात असले तरी, अतिशय जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी दिलेला जाहीर पाठींबा म्हणजे एका मित्राने दुसर्‍या मित्राला दिलेली साथ असल्याचे बोलले जात आहे. 

No comments:

Post a Comment