तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 23 October 2019

परळी विधानसभा निवडणुक मतमोजणीची जय्यत तयारी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
        233 परळी विधानसभा मतदारसंघ निवडणूक उद्या होणाऱ्या मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी थर्मल वसाहतीतील कल्ब बिल्डिंग परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून दुपारी 2 पर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. 
     संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघाची उद्या 24 आँक्टोंबर रोजी थर्मल काँलनीतील कल्ब बिल्डिंग येथे प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल आहेत. तर प्रत्येक डेबलवर 3 मतमोजणी कर्मचारी तैनात राहणार आहेत. मतमोजणीच्या 24 राऊंड होणार आहेत. सर्व प्रथम टपालाव्दारे झालेल्या मतदानाची आणि त्यानंतर मतदान यंत्रातील मतांची मोजणी होणार आहे. 
      निकाला दिवशी कार्यकर्ते व नागरिकांची परिसरात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने ध्वनिक्षेपक व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांना कोणत्या राऊंड मध्ये कोण आघाडीवर आहे हे कळणार आहे. 
     दरम्यान मतमोजणी केंद्रात फक्त निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे नियुक्त प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. मतदार संघातील पत्रकारांना मतमोजणीचे संकलन करता यावे यासाठी मिडीया सेलची बैठक व्यवस्था केली आहे. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 15 पोलिस अधिकारी, 200 पोलिस कर्मचारी, 50 होमगार्ड, 1 राज्य राखीव पोलिस दलाची टुकडी तैनात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment