तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

सुमनबाई संतराम मुंडे यांचे दुःखद निधन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
पांगरी येथील वारकरी संप्रदायातील ख्यातनाम ह.भ.प.संतरामजी रामकृष्ण मुंडे यांच्या पत्नी सुमनबाई मुंडे यांचे आज बुधवार दिनांक 9 रोजी पहाटे तीनच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 74 वर्ष होते. कुटुंबात पूर्वापार पासून वारकरी संप्रदाय परंपरा चालत आहे. सुमनबाई मुंडे याही अत्यंत धार्मिक, वारकरी, मनमिळावू स्वभावाच्या म्हणून पांगरी गाव परिसरात परिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती ह.भ.प.संतराम अण्णा मुंडे, तीन मुले, ह.भ.प. सुरेश महाराज मुंडे, रमेश संतराम मुंडे, ओमप्रकाश संतराम मुंडे, मुलगी सौ. सुनंदाबाई गणपतराव मुसळे, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. सुमनबाई मुंडे यांच्या निधनानंतर आज बुधवार रोजी पांगरी येथील स्मशानभूमीत सकाळी 10:30 च्या सुमारास ब्रह्मवंदाकडून विधीवत व वारकरी परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पांगरी व गाव परिसरातील नागरिक, महिला, नातेवाईक, वारकरी,अनेक मान्यवर उपस्थित होते.

  शुक्रवारी रक्षा विधी

 रक्षा विधि उद्या शुक्रवार दि.अकरा रोजी सकाळी सात वाजता पांगरी येथे होणार आहे. 

No comments:

Post a Comment