तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 October 2019

अंबाजोगाई पंचायत समितीचे माजी उपसभापती शंकरराव नागरगोजे यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश ; ना. पंकजाताई मुंडे यांना देणार मताधिक्यपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
      अंबाजोगाई पंचायत समितीचे माजी उपसभापती शंकरराव नागरगोजे यांनी आज कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. ना. पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. 
      शंकरराव नागरगोजे हे राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते होते. तेथील एकाधिकारशाहीला कंटाळून त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी फुलचंद मुंडे (दैठणा), माऊली हाडबे (हाडबेवाडी) यांनीही आज भाजपात प्रवेश केला. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. भाजपा महायुतीच्या उमेदवार ना. पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.

No comments:

Post a comment