तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

सौ.राजश्रीताई मुंडेंचा पोहनेरमध्ये तर अजय मुंडेंनी रेवली, परचूंडीत साधला मतदारांशी संवाद
वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी विधासभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी आज सौ.राजश्रीताई मुंडे यांनी पोहनेर मधील मतदारांशी संवाद साधला. तर जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांनी रेवली, परचूंडी येथे डोअर टू डोअर प्रचार फेरी काढून मतदारांना आवाहन केले. 

पोहनेर येथे सौ.राजश्रीताई मुंडे यांच्यासह प्रदिप खोसे, भारतदादा काकडे, नितीन काकडे, विशाल श्रीरंग, गोविंद काकडे, बाळू पवार, रामेश्वर काकडे, ग्रा.पं.सदस्या गंगाताई काकडे, आशाताई काकडे, अर्चनाताई भद्रे, रमेश मुजमूले, गजानन विभूते, शिवाजी भद्रे, शिवाजी काकडे आदी उपस्थित होते. 

दुसरीकडे जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे व पदाधिकार्‍यांनी रेवली आणि परचूंडी येथे प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला व धनंजय मुंडेंना विजयी करण्याचे आवाहन केले. गावात त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

No comments:

Post a comment