तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

देशमुख टाकळीत राष्ट्रवादीला खिंडार!शेकडो तरूणांचा भाजपात प्रवेश ; ना. पंकजाताई मुंडे यांना देणार मताधिक्यपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
       राष्ट्रवादी काँग्रेसला देशमुख टाकळीत मोठे खिंडार पडले आहे. विकासाला साथ देण्यासाठी गावातील असंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश करून महायुतीच्या उमेदवार ना. पंकजाताई मुंडे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. 
        टाकळी देशमुख येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी विकासाला साथ देण्याचा निश्चय व्यक्त करून भाजपात प्रवेश केला आहे. ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा दर्शविली असुन ताईंना गावातून भरभरून मतदान करून मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आज अंगद माणिकराव शिंदे , ज्ञानेश्वर साहेबराव शिंदे , संदीप अनंतराव शिंदे हे प्रमुख कार्यकर्ते यांनी पंडित शिंदे , प्रकाश शिंदे , चंद्रकांत शिंदे , पांडुरंग कांबळे , कृष्णा शिंदे , प्रताप शिंदे , हनुमान शिंदे , प्रदीप शिंदे , विजय शिंदे, यशवंत शिंदे , राजेभाऊ शिंगाडे , श्रीनिवास शिंदे ,दीपक शिंदे  आदींनी भाजपात प्रवेश केला. सर्व कार्यकर्त्यांचे खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी सर्वांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
       यावेळी जयश्रीताई मुंडे - गिते, सतीश मुंडे, भिमराव मुंडे, सुधाकर पौळ, संतोष सोळंके, लक्ष्मीकांत कराड, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, प्रवीण शिंदे, अशोक शिंदे ,गोविंद शिंदे , अतुल शिंदे,  संतोष शिंदे , सतीश शिंदे , सुग्रीव शिंदे, पद्माकर शिंदे, विशाल देशमुख हे उपस्थित होते.

No comments:

Post a comment