तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

परळी शहरात भाजपची प्रचार फेरी संपन्न,ना.पंकजाताई मुंडेंना मताधिक्य देण्याचा मतदारांचा निर्धार ; खा.प्रितमताईंनी साधला मतदारांशी संवादपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.०७----- राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री महायुतीच्या उमेदवार ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ भाजपतर्फे परळी शहरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी प्रचार फेरीत सहभागी होऊन मतदारांशी याप्रसंगी संवाद साधला.

परळी शहरातील पद्मावती गल्ली,नरहरी महाराज मंदिर परिसर,आनंद नगर,सुभाष चौक या भागातील मतदारांशी संवाद साधून परळीला देश पातळीवर नावलौकिक मिळवून देणाऱ्या लेकीचे हात बळकट करण्यासाठी आशीर्वाद देण्याचे आवाहन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी मतदारांना केले.याप्रसंगी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देताना ना.पंकजाताई मुंडे यांच्या विजयात मोठ्या मताधिक्याचे योगदान देऊन सन्मानपूर्वक विजय मिळवून देण्याचा निर्धार केला.

यावेळी प्रचार फेरीत खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या समवेत भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,जेष्ठ नेते दताप्पा इटके,विकासराव डुबे,शांतीलाल जैन,अशोक जैन,अरुण टाक,जयश्री गित्ते,मोहन जोशी,अनिष अग्रवाल,राहुल टाक, प्रशांत कराड,प्रियेश पवन मोदानी,नितीन समशेट्टी, सुनील चिकाटे, सुनील कांबळे,उमेश खाडे, राहुल केंद्रे,राजेश ताटीमाल चकोर मूळजकर, योगेश पांडकर,गोविंद चौरे,श्रीनिवास राऊत,वेदांत सारडा, समी शेख,बाळू लहाने यांच्यासहस असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment