तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

कसोटी क्रिकेटमध्ये दोनशे षटकारांचा घाव झेलणारा गोलंदाज आहे

 आपणा सर्वांना माहीती आहे की सर्वाधिक फटकेबाजी टि २० व वन डे क्रिकेटमध्ये होते. या फटकेबाजीमुळेच हे दोन्ही प्रकारचे क्रिकेट अल्पावधीतच लोकप्रिय झाले. फलंदाजांनी केलेल्या आक्रमक टोलेबाजीने प्रेक्षकांचे मनोरंजन तर होतेच, परंतु बिचाऱ्या गोलंदाजाचे काय हाल होत असतील ? याचा कधी कोणी विचार केला ?  सफेद चेंडूच्या या दोन्ही झटपट प्रकारात गोलंदाजांची ससेहोलपट होणारच हे दस्तुरखुद्ध त्या गोलंदाजालाही माहिती असते. परंतु शांत, संयमी व धिरोदात्त कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजी अभावानेच बघायला मिळते. तरीही काही आक्रमक फलंदाज आपला नैसर्गिक खेळ या प्रकारातही चालूच ठेवतात. मात्र त्यांचे शिकार होता ते गोलंदाज !                                                                               आपल्याला आश्चर्य वाटेल की, कसोटी क्रिकेटमध्येही आक्रमक फलंदाजांचा मार खाणारे गोलंदाज आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये जगभरातील समस्त फलंदाजांनी चोप दिलेला एक गोलंदाज आहे की त्याच्या गोलंदाजीवर दोनशेपेक्षा जास्त षटकार मारले आहेत. तो आहे आजच्या घडीचा ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फिरकी गोलंदाज नाथन लियॉन !  भारताने सन २०१८ च्या उत्तरार्धात भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यातील अॅडलेड येथे पहिल्या कसोटीत पहिल्याच दिवशी कसोटी इतिसासात कधी न घडलेला चमत्कार घडला. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लियान भारताच्या रोहित शर्माला गोलंदाजी टाकत होता. रोहितने लियानचा एक चेंडू डीप स्क्वेयर लेग सिमारेषेबाहेर टोलावला. प्रत्यक्षात मार्कस हॅरिसने उंच उडी मारत तो चेंडू पकडलाही परंतु या झेल घेण्याच्या प्रक्रीयेत हॅरिस स्वतःला सिमारेषेच्या आत थांबवू शकला नाही.परिणामतः रोहीत शर्माला सहा धावा मिळाल्या.  आजच्या विज्ञानाने प्रगत झालेल्या या युगात फलंदाजाने मारलेल्या षटकारांचीच सर्वात जास्त दखल घेतली गेली आहे. परंतु एका गोलंदाजाच्या गोलंदाजीवर या शांत प्रकारच्या कसोटी खेळात आपल्या गोलंदाजीवर २०० षटकार खाणारा पहिला गोलंदाज रोहित शर्माने मारलेल्या त्या षटकारने बनला नाथन लियॉन !                                                                                     खरं बघाल तर सन १९९८ पर्यंत एकाही क्रिकेटच्या सांख्यिकी तज्ञाने गोलंदाजांच्या गोलंदाजीवर मारलेल्या षटकारांची नोंद ठेवली नव्हती.सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया प्रांतातील एका क्रिकेट तज्ञाने या संबंधी प्रथमच एक प्रबंध तयार केला. यानंतर ऑस्ट्रेलियातीलच चार्लस् डेव्हीस या आकडे तज्ञाने या विषयावर सखोल अभ्यास केला. अनेक कसोटयांचे धावफलक तपासल्यानंतर तो आपल्या निष्कर्षापर्यंत पोहोचला. तरीही पूर्वीच्या काळातील रेकॉर्डवरून त्याला पूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. तरी पण बारकाईने मिळविळेल्या तपशिलानुसार गेल्या काही वर्षातच कसोटीत षटकारांचा वर्षाव व्हायला सुरुवात झाली. या निष्कर्षाप्रत तो  गेला.                                                                                           मोठया संशोधनानंतर श्रीलंकेचा विश्वविक्रमी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या गोलंदाजीवर १९८ षटकार मारल्याची नोंद सापडली. त्यामुळे नाथन लियॉनच्या गोलंदाजीवर मारलेल्या षटकारांची सविस्तर माहिती तपासल्यावर लियॉनच सर्वाधिक षटकारांचा घाव बसणारा गोलंदाज आहे हे सिद्ध झाले.                                                      फलंदाजांच्या चाबकासारख्या फिरणाऱ्या बॅटचे सपके बसलेल्या गोलंदाजात नाथन लियॉन २०० षटकार बसणारा पहिला गोलंदाज ठरला. तर १९८ षटकारांचा मार झेलणारा दुसरा गोलंदाज आहे मुथय्या मुरलीधरन. तिसऱ्या क्रमांकावर आहे न्युझिलंडचा डावखुरा फिरकीपटू डॅनिएल व्हेटोरी. व्हेटोरीच्या गोलंदाजीवर विविध फलंदाजांनी १८४ षटकार ठोकले आहेत. व्हेटोरीच्या गोलंदाजीवर एकटया अॅडम गिलख्रिस्टने १७ षटकार मारले असून कोणत्याही एका गोलंदाजाच्या गोलंदाजीवर कसोटीत संपूर्ण कारकिर्दीत सर्वाधिक षटकार मारण्याचा हा विश्वविक्रम आहे. वरील गोलंदाजांच्या नावावर एक नजर टाकली तर आपल्या लक्षात  येईल की, ते तिघेही फिरकी गोलंदाज आहेत. मग सर्वाधिक षटकार खाणारा वेगवान गोलंदाज कोण ?  हा प्रश्नही तुम्हाला  पडला असणार ?  त्याचे उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेचा मखया नतीनी. नतीनीच्या गोलंदाजीवर एकूण ६४ षटकारांचा वर्षाव झाला. एकविसाव्या शतकात खेळलेल्या कसोटींच्या आकडेवारीवर एक नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येकी २८० चेंडू नंतर एक षटकार बसतो. यात आणखी सखोल बघितले तर वेगवान गोलंदाजांच्या गोलंदाजीवर दर ६२९ चेंडूनंतर षटकार मारल्याचे आढळते, तर फिरकी गोलंदाजांच्या १५० चेंडू नंतर षटकार बसला 

No comments:

Post a Comment