तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

कर्मचार्‍यांच्या न्यायासाठी लढणारी एकमेव संघटना- प्रेमानंद मोर्या मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा कार्यकर्ता संपर्क मेळावा परळीत संपन्नपरळी वैजनाथ (प्रतिनिधि ) :-  परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील शक्तीकुंज वस्तीतील,नवीन क्लब बिल्डिंग येथे दि 8रोजी अत्यंत सध्या व प्रभावी पद्धतीने महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा कार्यकर्ता संपर्क मेळावा संपन्न  झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस प्रेमानंद मौर्य, उपसरचिटणीस एन.पी.शिंदे, महापारेषण चे अधीक्षक अभियंता आर.पी.चव्हाण, महानिर्मितीचे अधीक्षक अभियंता एस.एम.नरवाड साहेब तर संघटनेचे उपाध्यक्ष बी.एल.वडमारे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना आर पी चव्हाण म्हणाले कि, संघटनेसाठी प्रत्येक सभासदांनी व सर्व एस.सी.एस.ओबीसी, इ ज्यांना वाटते की स्वातंत्र्य,समता, बंधुता व न्याय प्रस्तापित व्हावे त्यांनी तन, मन, धन, व जमेल तसे संघटनेसाठी काम करावे.इतर   बहुजन आरक्षण विरोधी विषमतावादी संघटनेत न जाता महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटनेत सामील व्हावे.
या वेळी उपसरचिटणीस एन.पी.शिंदे म्हणाले कि सभासदसंख्या वाढवण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्नरत राहावे,35% च्या वर सभासद संख्या महापारेषण,महावितरण मध्ये झाली आहे,होत आहे तर महानिर्मिती मध्ये ते होणे अत्यंत गरजेचे आहे.संघटनेची सद्याचे मुख्यालयाच्या प्रश्नासंबंधी ते विविध विषयांवर माहिती विषद केली.
या वेळी प्रेमानंद मौर्य यांनी कर्मचार्‍यांच्या न्यायासाठी लढणारी एकमेव संघटना असुन पदोनीतीतील आरक्षणविषयी अत्यंत महत्वाची माहिती दिली तसेच एम.एस.ई.बी. करत असताना संघटनेने प्रशासनासमोर बौद्धिक,तांत्रिक व तार्किक पद्धतीने पगारवाढीसाठीची वास्तविक भूमिका मांडली व पटवून दिली त्यामुळेच तिन्ही कंपनीने संतोषजनक पगरवाढी संबंधी ठोस निर्णय घेऊ शकली,असेही ते या वेळी म्हणाले.
या वेळी त्यांनी सर्वांना आवाहन केले की प्रत्येकांनी आपल्या अस्तित्वासाठी व पदोन्नतीतील आरक्षण मिळविण्यासाठी तन, मन, धन प्रत्येक संघटनेच्या कार्यक्रमात,आंदोलनात,उपस्थिती,सकारात्मक बळ व सहकार्य करणे गरजेचे आहे व ते आपल्या भावी पिढी साठी व आपल्या अस्तित्वासाठी करणे अत्यावश्यक आहे,असे आवाहन केले.
8 ऑक्टोबर रोजी बहुजन नायक कांशीरामजी यांची 13 वी स्मृतिदिन असल्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मान्यवरांसह इंजि.भगवान साकसमुद्रे यांनी महापुरुषांना वंदन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना संघटनेचे अध्यक्ष राहुल बनसोडे व सूत्रसंचलन महेंद्र शिंदे तर आभार प्रदर्शन सचिव भागवत देवकर यांनी केले. या वेळी सन्माननीय सभासद बंधू भगिनी व अधिकारी अभियंते,कर्मचारीयांची उपस्थिती होती .

No comments:

Post a Comment