तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 27 October 2019

खऱ्या लक्ष्मीची पूजा अडोळी गांवात होते तेंव्हा?वैचारिक परिवर्तनाची नांदी

फुलचंद भगत
 वाशिम -दिवाळी सणाच्या मोठ्या उत्साहात अनेक संकल्पना साकार करण्यासाठी अनेकजण आपल्या कल्पना, आपली संस्कृती,भूमिका,आपली वाटचाल प्रगतीची दिशा अनेक कुटुंब,परिवार ठरवितात यादिवशी नवनवीन महागड्या वस्तू खरेदी करताना दिसतात. आपल्या आशा अंकाशा पूर्ण करण्यासाठी धडपड करतांना दिसतात. हे सर्व करत असतांना पती, पत्नीत विचार विनिमय होतो,कधी पत्नीच्या मनाने पतीला ऐकावे लागते. पत्नीच्या मनाने ऐकले नाही तर घरात त्या दोघात वादाला तोंड फुटते.आणि सोन्यासारख्या सणाच्या दिवशी मात्र पती, पत्नीत वाद निर्माण होऊन घरातील वातावरण विस्कळित होते. मात्र या आजच्या 21व्या शतकात या सर्व प्रकाराला नाकारून परिवर्तनवादी वाट शोधून फुले,शाहू, आंबेडकर,शिवाजी महाराज यांच्या विचारावर चालून "चक्क दिवाळीच्या दिवशी आपल्या पत्नीलाच ओवाळूनतिची पूजा करून खऱ्या लक्ष्मीचे दर्शन घडवून आणले.ते वाशिम येथून जवळच असलेल्या ग्राम अडोळी येथील सामाजिक,राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले गजानन बद्रीनाथ इढोळे यांनी आपल्या सौभाग्यवती सौ छाया यांची मानसन्मानाने पूजा करून 21 व्या शतकात खऱ्या लक्ष्मीचे दर्शन घडवून आणले.या त्यांच्या परिवर्तनवादी उपक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a Comment