तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

वर्ल्ड पार्लमेंट पुरस्कार आयुष्याला कलाटणी देणार - दत्ता विघावेश्रीरामपूर : - येथे येत्या डिसेंबर महिन्यात जागतिक संविधान व संसदीय संघ म्हणजे वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशनच्या ( डब्ल्यूसीपीए ) वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवान व्यक्तींना पुरस्कृत करण्यात येणार असून सदर कार्यक्रमाप्रसंगी डब्ल्यूसीपीएचे अध्यक्ष प्रा.डॉ ग्लेन मार्टीन हे स्वतःउपस्थित राहणार आहे.

                 डब्ल्यूसीपीए ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था असून तिचे मुख्यालय अमेरिकेतील कोलोरॅडो येथे आहे. या संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे प्रामाणिक व पारदर्शक समाजसेवा होय. हे कार्य करताना दहा तत्व काटेकोरपणे पाळले जातात. त्यापैकी प्रत्येकाने आपसात सुसंवाद साधणे. अहिंसेचे आचरण करणे. प्रत्येकाच्या मानवाधिकाराचे पालन करणे,  लोकशाही व कायद्याचे आदरपूर्वक पालन करणे. प्रत्येकाविषयी करूणा व दयाळूपणा दाखविणे,  विविधतेतील एकता जपणे, न्यायव्यवस्था भक्कम करणे, सामाजीक स्थिरता राखणे, जागतिक शिक्षण व्यवस्था सदृढ करणे. पृथ्वीची दक्षता व निगा राखणे  हे होय.

              डब्ल्यूसीपीए ही संस्था असैनिक व सामाजिक मार्गाने चालविली जाते. या संस्थेचा व राजकारणाचा काडीचाही संबंध नसून फक्त सामाजीक कार्य हाच एकमेव उद्देश आहे. हाच उद्देश समोर ठेऊन डब्ल्यूसीपीएने प्रथमच समाजातील विविध क्षेत्रातील गुणवान व्यक्तींना सन्मानीत करून सदस्यत्व बहाल करण्याचा जाहीर कार्यक्रम श्रीरामपूर येथे करण्याचे नियोजन केले असून अश्याप्रकारे जगातील पहिला जाहिर कार्यकम आयोजित करण्याचा मान श्रीरामपूरला मिळत आहे.

              डब्ल्यूसीपीए ही जागतिक मान्यताप्राप्त संस्था असल्याने तिचे सदस्यत्व मिळविणे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते स्वप्न साकार करण्यासाठी डब्ल्यूसीपीएने एक पुरस्कार योजना आखून अश्या गुणवतांना थेट संस्थेचे आजीव सदस्यत्व दिले जाणार आहे. तसेच सदर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या सदस्यांची माहिती डब्ल्यूसीपीएच्या अधिकृत वेबसाईटवर टाकून त्यांच्या कार्याची माहिती जगासमोर ठेवली जाणार आहे. तसेच हा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना ते ज्या सरकारी नोकरीत असतील तेथे प्रमोशनसाठी लाभ होऊ शकतो. तसेच इतर शासकीय पुरस्कार मिळविण्यासाठी आपण सदर पुरस्काराची रितसर सरकार दफ्तरी नोंद केल्यास आपल्याला फायद्याचे ठरेल.

               एकंदर डब्ल्यूसीपीएशी जोडल्यानंतर पुरस्कार्थींच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी मिळणार आहे. त्यामुळे हे पुरस्कार मिळविण्यासाठी पात्र व्यक्तींनी आपला बायोडाटा योग्य पुराव्यांनिशी १५ ऑक्टोबर पर्यंत - दत्ता विघावे,  इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मोबाईल. - ९०९६३७२०८२. मु.पो. - खंडाळा, ता. श्रीरामपूर, 

जि. अहमदनगर, महाराष्ट्र ' पिन -४१३७०९. या पत्त्यावर पाठवावे असे दत्ता विघावे, इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment