तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 October 2019

अभिनव विद्यालयात भारतरत्न डॉ .ए.पी .जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ  संचलित  अभिनव विद्यालय  नेहरू चौक परळी  येथे  संस्थेचे  सचिव  परळी भूषण  साहेबराव फड  व अध्यक्ष  राजाभाऊ जब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे माजी राष्ट्रपती डॉ .ए.  पी  .जे . अब्दुल कलाम  यांची जयंती  वाचन प्रेरणा दिन  म्हणून साजरी करण्यात आली  या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड व प्रमुख अतिथी म्हणून वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष राजेश देशमुख, विजय वाकेकर ,दत्तापा ईटके व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर  एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रथमेश  पुष्पहार  मान्यवरांच्या हस्ते  अर्पण करून झाली  तसेच  डॉ. ए .पी .जे .अब्दुल कलाम  यांच्याविषयी  शाळेतील  सहशिक्षक  सिताराम गुट्टे  यांनी माहिती दिली  डॉ. ए .पी.जे. अब्दुल कलाम  यांचा जन्म  तामिळनाडूतील  रामेश्वर या ठिकाणी  15 ऑक्टोबर  1931  मध्ये झाला सन  2002  ते  2007 पर्यंत  भारताचे  11 वे राष्ट्रपती म्हणून  त्यांनी पदभार सांभाळला .१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग  घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या ‘विक्रम साराभाई अवकाश केंद्रा’चे ते प्रमुख झाले.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम यांनी आपले आयुष्य राष्ट्रहित व भारतमातेची सेवा करण्यासाठी जगले असे प्रतिपादन सिताराम गुट्टे यांनी केले तसेच वाचन प्रेरणा दिन म्हणून शाळेतील विद्यार्थ्याने एक तास वाचन केले या कार्यक्रमास सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a comment