तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

धनंजय मुंडेंच्या प्रचार फेरीचा गणेशपार भागातून दणक्यात शुभारंभ
उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आले लोक चळवळीचे स्वरूप

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.09.............. परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे व मित्र पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज शहरातील गणेशपार भागातून झाला. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत पदाधिकार्‍यांनी धनंजय मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले, त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता धनंजय मुंडे यांना निवडूण आणणे ही आता लोकचळवळच झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

गणेशपार, होळकर चौक, देशमुख गल्ली, जगतकर गल्ली, प्रबुध्दनगर, जंगम गल्ली, गोडाळे गल्ली, धोकटे गल्ली, अंबेवेस, कणवगल्ली, गोपाळ टॉकीज आदी भागातील प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत जावून धनंजय मुंडेंसाठी आशीर्वाद मागितले  व विजयी करण्याचे आवाहन केले. घोषणांच्या निनादात निघालेल्या या रॅलीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. 

झाली लोक चळवळ

सत्तेत असलेल्या ज्यांनी विकास करायचा असतो त्यांनी तर कुठलेच काम केले नाही, मात्र आमच्या लहान-मोठ्या अडचणीत धावून येणार्‍या, दुष्काळात पाण्याची सोय करणार्‍या धनुभाऊंना यावेळी आम्ही विजयी करणार असा शब्द यावेळी मतदारांनी दिला.

या रॅलीत ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.सुरेश चौधरी, वसंतराव मुंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबु नंबरदार, जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी, सुरेश टाक, वैजनाथराव सोळंके, माधव ताटे, प्रा.डॉ.विनोद जगतकर, उपनगराध्यक्ष अय्युबभाई, रिपाई कवाडे गटाचे सोपानराव ताटे, नगरसेवक जाबेरखान पठाण, नरेश हालगे, अजिजभाई कच्छी, सय्यद सिराज, जयप्रकाश लड्डा, राजाखान पठाण, गोविंद कुकर, अनिल अष्टेकर, मानवहित लोकशाही आघाडीचे डॉ.माणिक कांबळे, भागवत वाघमारे, रमेश भोयटे, एतेशाम खतीब, अ‍ॅड.जीवनराव देशमुख, माकपाचे कॉ.माणिकराव नागरगोजे, कॉ.किरण सावजी, दत्ता सावंत, शंकर आडेपवार, के.डी.उपाडे, अनंत इंगळे, जमील अध्यक्ष, वैजनाथ बागवाले, प्रताप देशमुख, डॉ.आनंद टिंबे, फरकुंद अली बेग, श्रीहरी कवडेकर, प्रताप देशमुख, लालाखान पठाण, अल्ताफ पठाण, सुरेंद्र कावरे, रवि मुळे, धम्मा अवचारे, अमर रोडे, फेरोज खान, तक्की खान, अजमत खान, महादेव तांदळे, अर्चनाताई रोडे, लहुदास तांदळे, सुलभाताई साळवे, अन्नपुर्णाताई जाधव, अल्ताफ शेख, रमेश मस्के, भागवत कसबे, सुनंदाताई साळवे, वैशालीताई तिडके आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

गुरूवारची प्रचार फेरी

दरम्यान गुरूवारी सकाळच्या सत्रात 08 वाजल्यापासून दसरा मैदान, रमानगर, साठेनगर, ताटे गल्ली, आदोडे गल्ली, रोडे गल्ली, उखळवेस, चर्मकार गल्ली, मेहंदीपुरा, बिडगर गल्ली, देशपांडे गल्ली, अनंतपुरे गल्ली, कुंभारगल्ली, गवंडी गल्ली तर दुपारच्या सत्रात 4 वाजता खंडोबा मंदिर, सावतामाळी महाराज मंदिर, किर्तीनगर, संत नामदेव महाराज मंदिर, कृष्णानगर, स्वराज्य चौक, सिध्देश्वर नगर, गंगासागरनगर 40 फूटी नगर, संत तुकाराम महाराज मंदिर, संतोषीमाता मंदिर खुदबेनगर, बरकतनगर रोड ते संत नरहरी महाराज मंदिर आदी भागातील मतदारांच्या भेटी घेण्यात येणार आहेत. 

No comments:

Post a Comment