तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

परतूर येथे विजयादशमी निमित्त उद्या रा.स्व.संघाचे पथसंचलन

 धी
-येथे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी निमित्त दि.१० ऑक्टोबर रोजी शहरातून स्वयंसेवकांचे गणवेशात सघोष पथसंचलन काढण्यात येणार आहे.या निमित्त मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून संघाचे जालना जिल्हा प्रचारक विकास देशपांडे हे उपस्थित राहणार आहेत.ह्या संचलनाची सुरुवात सायंकाळी ४.३० वाजता विठ्ठल मंदिरापासून होऊन गाव भागातून काढून परत विठ्ठल मंदिरात संचलनाचा समारोप होणार असून यावेळी शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन होणार असून प्रमुख वक्ते विकास देशपांडे हे उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत,तरी शहरातील सर्व स्वयंसेवकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment