तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

युवानेते बापू गायकवाड यांचा ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते तथा रिपाइं चे शहराध्यक्ष बाबासाहेब उर्फ बापू गायकवाड यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत दि.१९ रोजी परळीच्या मोंढा मैदानावर झालेल्या सभेत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी कृषी बाजार समितीचे माजी सभापती सूर्यभाननाना मुंडे, उपसरपंच डॉ.संदीपान काळे, बालासाहेब मुंडे, नाथ प्रतिष्ठानचे अनंत इंगळे यांच्या मार्गदर्शनात बापू गायकवाड यांच्यासह अशोक गवळी, महादेव कांबळे, संतोष कांबळे, विलास गायकवाड, रवी गवळी, छोटू व्हावळे, बाबासाहेब गायकवाड, भैय्या कसबे, संतोष मुंडे, साहिल रोडे, मनोज कांबळे, राहुल सिरसाट, अशोक क्षीरसागर, मंगेश कांबळे, विकास गायकवाड, चेतन घुटके, अशोक व्हावळे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी ना.धनंजय मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन बापू गायकवाड यांनी केले. ते म्हणाले संविधान बदलू पाहणाऱ्या भाजप सरकारचे षडयंत्र हाणून पाडा. यावेळी रा.कॉ.चे नेते दत्ता सावंत, महेंद्र रोडे, संजय व्हावळे, अशोक गवळी यांनी युवानेते बापू गायकवाड यांच राष्ट्रवादीत प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले.

No comments:

Post a comment