तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 31 October 2019

मो.यूसुफ पुंजानी यांचा काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश


मुंबईत काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घेतला प्रवेश

फुलचंद भगत
कारंजा- तालुक्यासह संपूर्ण वाशिम जिल्ह्यात भारीप बहुजन महासंघाचा दबदबा निर्माण करणारे तसेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर कारंजा मानोरा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे बहुजनाचे नेते हाजी मो. युसुफ पुंजांनी यांनी विधानसभा निवडणुकीनंतर काॅंग्रेसपक्षात प्रवेश केला. ३१ आॅक्टोंबर रोजी मुंबई येथील काॅंग्रेस कार्यालयात त्यांनी प्रवेश घेतला.   

यावेळी काॅंग्रेसचे वरिष्ठ नेेते गुलाबनबी आझाद, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ.नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आ. वजाहद मिर्झा, महाराष्ट्र प्रभारी मलिकार्जुन खर्गे, यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. पुंजांनी यांच्या काॅंग्रेस प्रवेशाने पक्षाला नवसंजीवनी मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे. सन २०१९ ची विधानसभा निवडणुक जाहीर होताच काॅंग्रेस पक्षाला गळती लागल्याने कारंजा तालुक्यातील काॅंग्रेसच्या अधिकांश नेत्यांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. तसेच कारंजा तालुक्यात मागील काही दिवसांपासून काॅंग्रेसची अवस्था अतिशय बिकट झाली होती. अशातच बहुजन नेते पुंजांनी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने काॅंग्रेसला चांगले दिवस येतील यात शंका नाही. नव्यानेच राजकारणात काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेल्या पुंजांनी यांनी कारंजा तालुक्यासह संपूर्ण वाशिम जिल्ह्यात भारीप बहुजन महासंघाच्या कार्याचे जाळे विणून पक्षसंघटन मजबुत केले. त्यांनी आपल्या स्वःकर्तुत्वाच्या जोरावर सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कारंजा मानोरा मतदारसंघात चांगले मताधिक्य घेऊन दुसरा क्रमांक राखला. यंदाच्या निवडणुकीत मात्र वंचित आघाडीकडून त्यांना उमेदवारी न मिळयाने बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर निवडणुक लढवून कारंजा मानोरा मतदारसंघात ४२ हजार मताधिक्य संपादन केले. यावरून युसुफ पुंजांनी यांची ताकद दिसून येते. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने कारंजा तालुक्यात काॅंग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर होण्यास मदत होईल.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a comment