तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

परतुरात रावण दहन उत्साहात वाईट प्रवृत्तीवर मात करत सत्याचा विजय म्हणजे रावण दहन-सोपान बांगरपरतूर

आशिष धुमाळ

येथील दसरा उत्सव समितीच्या वतीने विजया दशमी निम्मित साईनाथ मंदिराच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात रावण दहन कार्यक्रम पार पडला.यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर,माजी आ.सुरेशकुमार जेथलिया,उपविभागीय पोलीस अधिकारी सोपान बांगर,पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे, माजी नगराध्यक्ष प्रदीप लढा,राहुल लोणीकर,कुणाल आकात,दसरा समितीचे अध्यक्ष राजकुमार भारुका, कार्याध्यक्ष अजय देसाई,उपाध्यक्ष राजेंद्र मुंदडा,सचिव कैलास सोळंके,डॉ.भगवान दिरंगे,परेश पाटील,रामेश्वर नळगे,वैजनाथ बागल,गणेश पवार,राजेभाऊ पवार आदी उपस्थित होते.यावेळी ४१ फुटी भव्य रावण तयार करण्यात आला,सर्व प्रमुखांच्या उपस्थितीत सायंकाळी साडे सहा वाजता रावणाचे दहन करण्यात आले. यावेळी नयन रम्य रंगीत फटाक्यांची आतषबाजीने परिसर दणाणून गेला.या निमित्त मनोगत व्यक्त करतांना उपविभागीय पोलिस अधिकारी सोपान बांगर म्हणाले की,वाईट प्रवृत्तीवर सत्याचा विजय म्हणजे रावण दहन होय.सर्वांनी प्रत्येकाशी प्रेमाने वागा हे जीवन पुन्हा पुन्हा येत नाही हाच संदेश दसरा सण देतो.यावेळी शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

No comments:

Post a comment