तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 23 October 2019

परळीत विधानसभा निवडणुकीत कमळ उमलणार का? घडी वाजणार? उस्तुकता आज सपंणार!


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  महाराष्ट्राचे लक्ष लागुन असलेल्या परळी मतदार संघात झालेल्या निवडणुकीचा आज निकाल लागणार असुन परळीत कमळ उमलणार का? घडी वाजणार हे दुपार पर्यंत स्पष्ट होणार असुन इतके दिवस असलेली उस्तुकता आज सपंणार आहे.
परळीतील औष्णिक विद्युत केद्रांच्या शक्तिकुंज वसाहतीतील क्लब हाँऊस येथे आज सकाळी आठ वाजल्या पासुन मत मोजणीला सुरूवात होणार आहे. या मतमोजणीसाठी 14 टेबलची व्यवस्था केली असुन 24 फेऱ्या होणार आहे. या मत मोजणीसाठी 56 कर्मचारी राहणार असुन 15 पोलीस अधिकारी, 200 पोलीस कर्मचारी,50 होमगार्ड व राज्य राखीव पोलीसदलाची 1 तुकडी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलीे आहे तर निवडणुक मतमोजणी निरिक्षक म्हणुन एन.पद्दमकुमार यांची नियुक्ती केली गेली आहे. या मतदारसंघात भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मुख्य लढत झाली असुन विक्रमी असे 72:23 टक्के मतदान झाले आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत  शहरात व तालुक्यात उस्तुकता वाढली असुन ती आज दुपार नंतर मतदारानीं आपला कौल कोणाला दिला हे स्पष्ट होणार आहे.
                   
पंकजाताई मुंडे 25 हजाराच्या फरकाने निवडुन येणार- जुगलकिशोर लोहिया

हि निवडणुक विकासाच्या मुद्यावर भाजपाने लढवली असुन कोट्यावधीची कामे शहरात व तालुक्यात केली गेली आहे.परळी मतदारसंघात मतदाराचां कौल भाजपाकडे वाढला असुन पंकजा ताई मुंडे या 25 हजार मताने विजयी होणार असे भाजपाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी आमच्या परळी प्रतिनिधी जवळ सांगीतले आहे.
                     
15-20 हजारानीं धनंजय मुंडे जिकंणार- डाँ.संतोष मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमचे नेते धनंजय मुंडे यांची निवडणुक परळी मतदारसंघातील मतदारांनी व खास करूण तरूणाईनीं आपला नेता आपल्या साठी उभा आहे म्हणुन स्वता हाती घेतली त्यावरून धनंजय मुंडे हे 15/20हजार मतानीं विजयी होवुन विधानसभेत जाणार असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष डाँ.संतोष मुंडे यांनी विश्वास व्यक्त केला.

No comments:

Post a comment