तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 20 October 2019

भयमुक्त आणि विकासयुक्त वातारणासाठी ना. पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा-खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केले मतदारांना आवाहनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. २०----राष्ट्रवादी काँग्रेसने राजकारण खालच्या पातळीवर नेले आहे, स्वतःच्या बहिणीवर जाहीर सभेतुन अतिशय हीन आणि लज्जास्पद वक्तव्य करून समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे. ही विकृती आपल्याला कायमची संपवायची आहे, परळीत भयमुक्त आणि विकासयुक्त वातावरण निर्माण करायचे आहे यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन स्त्री शक्तीचा अवमान सहन केला जात नाही असे मतपेटीतून दाखवून द्यावे असे आवाहन खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी व भाजपा महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

      ना. पंकजाताई मुंडे  सतत महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहेत. परळीच्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. त्यांच्याकडे जी जी खाती आली त्याचे त्यांनी चांगले काम करून त्या खात्याचा नावलौकिक वाढविला आहे. जलसंधारणाची कामे करून पाणी पातळी वाढवण्याचे काम केले. महिला व बालकल्याण खात्याच्या माध्यमातून त्यांनी लहान मुलांच्या कुपोषणाचा प्रश्न मार्गी लावला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गट चळवळ उभी करून महिलांना रोजगार मिळवून दिला. एवढेच नव्हे तर बचत गटाने तयार केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली. महिला स्वावलंबी करण्याचे काम त्यांनी केले. प्रत्येक खात्यात प्रभावी आणि भ्रष्टाचारमुक्त योजना राबवून वेगळी ओळख निर्माण केली. शासकीय बदल्यांमध्ये सुसूत्रता आणुन गैरसोय दूर केली. 
      मराठवाड्याचे वैभव, बारा जोतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे तर शहरातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. 

पंतप्रधानांकडून कौतुक

बचत गटाचे चांगले काम करून महिलांना प्रोत्साहन दिले म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना. पंकजाताई मुंडे यांचे कौतुक केले. ना. पंकजाताई मुंडे यांनी परळी मतदार संघातही विकासाला गती दिली आहे. त्यांच्यामुळे परळी - बीड - नगर रेल्वे मार्गासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असुन ते काम आता अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात आणला आहे. आंतर्गत रस्ते आणि पाण्याची सोय झाल्याने ग्रामीण भागात विकासाला गती मिळाली आहे.    
     मराठवाड्यातुन दुष्काळ कायमचा हद्दपार करण्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी अशी वाॅटर ग्रीड योजना मंजूर केली असून त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. अशी विविध लोककल्याणकारी कामे केली आहेत. विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a comment