तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 24 October 2019

वृध्दीमान साहा बनला एक नंबर कसोटी यष्टीरक्षक                        वृध्दीमान साहा नावाचा एक छोट्या चणीचा अतिशय चपळ मुलगा २४ ऑक्टोबर १९८४ रोजी पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे जन्मला. अफाट मेहनत, रबरासारखे लवचिक शरीर व सळसळता उत्साह यांच्या जोरावर हा आज तमाम क्रिकेट जगतात कसोटी खेळणाऱ्या यष्टीरक्षकात सर्वोत्तम यष्टीरक्षक ठरला आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुणे कसोटीत त्याने ज्या पद्धतीने चपळता दाखविली ती सुपरमॅनलाही लाजवेल अशी होती. त्याच्या याच चपळतेचा लाभ भारतीय गोलंदाजांना झाला. त्याच्या याच अफलातून कामगिरीच्या बळावर भारताला दक्षिण आफ्रिकेला क्लिन स्वीप देता आला.

                        एका किरकोळ दुखापतीमुळे त्याला कसोटी संघातून २० महिने दूर राहावे लागले तेव्हा सर्वांनाच त् होती की साहाची कारकिर्द संपली. परंतु धोनीच्या कसोटी निवृत्ती नंतर संघात आलेल्या साहाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळताच तिचं सोनं केलं. याचेच फळ त्याला आयसीसी मानांकनात एक नंबरचे रँकींग मिळाले.

                      सन २०१८ मध्ये साहाला दुखापत झाली. त्यानंतर इंग्लंड दौऱ्या पर्यंत तो तंदुरुस्त होईल या आशेने बंगलुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अॅकेडमीत पुनर्वसन करण्यास गेला. परंतु त्याची किरकोळ दुखापत तेथील वरिष्ठ फिजीयोंच्या उपस्थित बरी व्हायच्या ऐवजी चिकदळली. या मागे नेमकं काय राजकारण होतं हे उघड झालं नाही परंतु त्यानंतर मात्र साहा असाह्य झाला. त्याचा इंग्लंड व ऑस्ट्रेलिया दौराही हुकला. त्याच्या जागेवर संधी मिळालेल्या रिषभ पंतने संधीचा लाभही उठवला. परंतु पंत सातत्य राखण्यात कमी पडला. या दरम्यान साहाही दुखापतीतून सावरला. नंतर भारतात आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पंतला डच्चू मिळाला. मग साहाने मागे वळून न बघता आपल्या नावाप्रमाणे कामातही वृध्दी करत संघाचं काम आणखी कसं वृध्दींगत होईल याची दक्षता घेत भारताच्या यशासाठी स्टंप्सच्या मागे अफलातून चपळता दाखवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याचा लाभ त्याचे कसोटी मानांकन उच्च स्थानी पोहोचण्यात 

झाला.

                 वृध्दीमान साहाची कारकीर्द अतिशय चढउतारांची ठरली आहे. फलंदाजी त्याची जमेची बाजू असली तरी यष्टीरक्षणात तो अतिशय तरबेज आहे. ३५ कसोटयात ४८ डावात ३ शतकांसह १२०९ धावा करताना संघाला गरज असताना डाव सांभाळण्याचे कामही त्याने मोठया जबाबदारीने केले आहे. त्याच बरोबर ३५ कसोटी सामन्यात ८६ झेल व १५ यष्टीचीत अशी यष्टी मागील त्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. नऊ वनडे सामन्यातही १७ झेल घेऊन त्याने आपली चुणूक दाखवून दिली आहे. वरील आकडेवारी भुरळ घालणारी नसली तरी त्याची विकेटकिपींग भल्याभल्या तज्ञांना मंत्रमुग्ध करून जाते. हेच त्याची नंबर एक यष्टीरक्षक बनण्याचे वैशीष्टये आहे.

                   तंत्रशुद्ध यष्टीरक्षक म्हणून सिद्ध झालेला वृध्दीमान साहा भारताचा असा पहिला यष्टीरक्षक आहे की ज्याने फलंदाजीत देशात व परदेशातही कसोटी शतके केली आहे. साहाने भारतात दोन व विंडीज मध्ये एक शतक ठोकले आहे. त्याच्या नंतर रिषभ पंतनेही भारतात व इंग्लंडमध्ये एक एक शतक फटकविले आहे. परंतु रिषभ पंत साहाच्या तुलनेत यष्टीरक्षणात कमजोर आहे. मात्र फलंदाजीत तो साहा पेक्षा उजवा आहे. परंतु फलंदाजीत सातत्य नसल्याने त्याला संघातील स्थान गमवावे लागले. मात्र या संधीचा लाभ उठवत साहाने स्वतःला नंबर एक यष्टीरक्षक म्हणून केले. वृध्दीमान साहाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !

 लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment