तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

बेरोजगारी संपवण्यासाठी परळीत पंचतारांकीत एम.आय.डी.सी. उभारणीचे स्व.मुंडे साहेबांचे स्वप्न मीच पुर्ण करणार- धनंजय मुंडे
पुण्यात स्थायिक झालेल्या परळीतील मतदारांनी दिला जाहीर पाठींबा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.07.......  परळी विधानसभा मतदारसंघातील आजच दोनच प्रश्न महत्वाचे आहेत. त्यात एक शेतकर्‍यांचा आणि दुसरा बेरोजगारांचा. मतदारसंघातील संपूर्ण बेरोजगारी संपवून टाकण्यासाठी स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी पाहीलेले पंचतारांकीत एम.आय.डी.सी. चे स्वप्न मीच पुर्ण करणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. 

रोजगारानिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या परळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा रविवारी बाणेर येथे भव्य मेळावा झाला त्यावेळी ते बोलत होते. आज रोजगार नसल्याने परळीच्या नागरिकांना पुण्यामध्ये यावे लागते, हा रोजगार परळीतच मिळावा यासाठी स्व.मुंडे साहेबांनी पंचतारांकीत एम.आय.डी.सी. चे स्वप्न पाहीले होते. मात्र सत्ता असूनही परळीच्या लोकप्रतिनिधींनी त्यासाठी प्रयत्न केला नाही. मी तर फाटका आहे, तरीही एम.आय.डी.सी. तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र लोकप्रतिनिधींकडे स्व.मुंडे साहेबांचे नाव, सत्ता असतानाही त्यांनी हालचाल केली नाही. ताईसाहेब केवळ मुंडे साहेबांचे नाव लावतात, मुंडे साहेबांचे त्यांना स्वप्नच माहीत नाही, मी मुंडे साहेबांच्या पोटी जन्मलो नसलो तरी सावली सारखा त्यांच्या सोबत राहिलो असल्याने त्यांची स्वप्न मला माहीत असल्याने त्यांची स्वप्ने मीच पुर्ण करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.

मातीशी प्रेम नाही म्हणून विकास नाही

सद्या सोशल मिडीयावर भाजपच्या वतीने सुरू असलेल्या मंत्री हवा की, केवळ विरोधी बाकावरचा आमदार असा प्रचार केला जात आहे, त्याचा समाचार घेताना पाच वर्ष मंत्रीपद होते,  परळीला काय मिळाले ?असा सवाल उपस्थित करताना आपल्या लोकप्रतिनिधींना मातीशी इमान नाही, मातीशी प्रेम नाही, म्हणून परळीचा विकास झाला नाही. मतातून जिंकण्यापेक्षा लोकांच्या मनात स्थान निर्माण करणे महत्वाचे असते, आणि तुमची उपस्थिती म्हणजे मी तुमच्या मनात स्थान निर्माण केल्याचा पुरावा असल्याचे ते म्हणाले.

विजयी उत्साहात

बाणेर भागातील हा कार्यक्रम दुपारी 04 वाजता असताना तब्बल 4 तास उशिरा म्हणजे रात्री 08 वाजता सुरू होवूनही पुणेकर झालेल्या परळीकरांनी प्रचंड उत्साह दाखवला त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त करून, एकवेळ संधी देण्याची विनंती केली. 

या मेळाव्याचे आयोजन मोहन भोसले, सुभाष जावळे यांनी केले होते. यावेळी दादासाहेब मुंडे, माऊली तात्या गडदे, संजय आघाव, पं.स.सदस्य प्रशांत भैय्या जगताप, रणजित हारे, सतिश गंगणे, मनोज गंगणे, अरूण जगताप आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a comment