तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 20 October 2019पाच तासांत दोन लाखांपेक्षा अधिक जणांनी बघितली पत्रकार परिषद

भाजपाच्या अफवांपासून रहा सावधान

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  सोशल मीडिया वरील त्या बनावट आणि धनंजय मुंडे यांची बदनामी करणा-या क्लीपचे प्रकरण भाजपाच्याच अंगलट आले आहे. कर नाही त्याला डर कसला म्हणत धनंजय मुंडे यांनी सर्व गोष्टीचा स्वतः खुलासा केला.

पाच तासांत दोन लाखांपेक्षा अधिक जणांनी पत्रकार परिषद बघितली तरीही भाजपच्या डोळ्यावर झापडं लागलेली आहेत. https://www.facebook.com/DPMunde/videos/408747596477641/

भाजपकडून सुरू असलेल्या खालच्या स्तराच्या राजकारणावर व्यथित होऊन धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांचे खंडन केले. तरीही विरोधक धनंजय मुंडे नॉट रीचेबल असा अपप्रचार करत आहे.

निवडणूक अवघ्या काही तासांवर आली असताना अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करत आहेत.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा प्रचाराला येऊन सुद्धा जनतेत नाराजी आहे हे भाजपला कळून चुकले म्हणून धनंजय मुंडेंवर व्यक्तीगत स्तरावर वार सुरू केलेत. जनताच आता मतदानातून भाजपला उत्तर देईल. त्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

धनुभाऊ मुंडे विषयी सहानूभुती

दरम्यान 1500 बहिणींचे विवाह करणारा भाऊ कोणत्याच महिले विषयी वाईट बोलू शकत नाही. आम्ही त्यांचे काम आणि अनुभव जवळून पाहिला आहे, मतांच्या राजकारणासाठी भाजपा कडून होत असलेल्या या राजकारणाचा सर्व स्तरातुन विशेषतः महिला वर्गातून मोठ्या प्रमाणावर निषेध होत आहे.

No comments:

Post a Comment