तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

संभाजी ब्रिगेड परळी वैजनाथ


तालुकाध्यक्षपदी शिवश्री देवराव लुगडे (महाराज) यांची निवड

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- आज दिनांक 9 10 2019 वार बुधवार रोजी संभाजी ब्रिगेड तालुक्या ची महत्वपूर्ण बैठक झाली त्यामध्ये सर्वानुमते संभाजी ब्रिगेडच्या परळी वै. तालुका अध्यक्षपदी माझी  निवड करण्यात आली,
 या बैठकीला उपस्थित मराठा सेवा संघ प्रणित वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष
 शिवश्री प्रा.भास्कर निर्मळ सर, 
संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हाध्यक्ष गोविंदआप्पा पोतंगले ,
मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवश्री अंकुशराव जाधव ,मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री प्रकाश लेनेकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाउध्यक्ष शिवश्री इंजि. संजय नाना देशमुख , मराठा सेवा संघाचे तालुका कार्याध्यक्ष शिवश्री राजेश ठोंबरे,मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष शिवश्री रामराव तात्या जाधव ,
मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष संदीप काळे ,शहर सचिव राजेश पवार, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब हंगरगे सर, मराठा सेवा संघाचे तालुका कोषाध्यक्ष शिवश्री विजयराव लुगडे ,मराठा सेवा संघाचे शिवश्री शिवश्री ईश्वर जीजा सोनवणे मराठा सेवा संघाचे शिवश्री दशरथ दादा इंगळे मराठा सेवा संघाचे विशाल माने शिवश्री पुंडलिक लोणकर 
तसेच याप्रसंगी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांचा दांडगा जनसंपर्क सेवा संघाच्या विचारधारेशी असलेला प्रमाणिकपणा यामुळे संभाजी ब्रिगेड निश्चितच वाढीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले व देवराव लुगडे महाराज यांना पुढील वाटचालीस शिवमय शुभेच्छा दिल्या
माझी संभाजी ब्रिगेड परळी वै. तालुका अध्यक्षपदी जी माझ्यावर विश्वास टाकून निवड केली निश्चितच मराठा सेवा संघाची युगपुरुष खेडेकर साहेबांची शिवधर्माची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम आतापर्यंत प्रामाणिकपणे केले यापुढेही आयुष्यभर निश्चितच करत राहणार यात तिळमात्र शंका नाही
 शंभर टक्के राजकारण शंभर टक्के समाजकारण या उक्तीप्रमाणे संभाजी ब्रिगेडचे काम प्रामाणिकपणे करण्याचं याठिकाणी प्रयत्न करतो व निश्चितच महाराष्ट्रामध्ये परळी-वैद्यनाथ तालुक्यात संभाजी ब्रिगेडच काम नंबर 1 वर असेल अशी याप्रसंगी ग्वाही  देतो व माझी निवड केल्याबद्दल सर्व वरिष्ठांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

No comments:

Post a comment