तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

ना. पंकजाताई मुंडे यांनी केला प्रा. टी.पी. मुंडे यांचा सन्मान!; अमितभाई शहा यांच्याशी करून दिली विशेष ओळख आणि भाईंनीही केले कौतुक
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
      " ये मेरे काका है, ईन्होने दो बार मेरे खिलाफ चुनाव लढा लेकीन अभी ओ अपने साथ है" ना. पंकजाताई मुंडे यांनी अशी ओळख जेष्ठ नेते प्रा. टी.पी. मुंडे यांची करून देताच केंद्रीय गृहमंत्री ना. अमितभाई शहा यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि "अरे ये तो बहोत अच्छे नेता है "असे म्हणत त्यांचे कौतुक केले आणि" आपका सम्मान होगा "असा शब्दही दिला. लेकीने वाढवलेल्या सन्माने प्रा. मुंडे भारावून गेले.
      निमित्त होते भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्याचे! नुकतेच भाजपसोबत आलेले जेष्ठ नेते प्रा. टी.पी. मुंडे हे मेळाव्यासाठी सावरगाव घाट येथे हेलीपॅडवर आले असता सर्व नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री ना. अमितभाई शहा यांचे स्वागत केले. यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांनी प्रा. टी.पी. मुंडे यांना जवळ बोलावून घेत त्यांची ओळख करून दिली. ये पहले भाजपामे ही थे गोपीनाथराव मुंडे साहब के साथ ईन्होने काम किया था. बीचमे बहोत साल दुर थे. मेरे खिलाफ दो बार चुनाव लढा लेकीन अभी ओ अपने साथ है अशी जिव्हाळ्याने ओळख करून दिली. शहा यांनी हसुन हस्तांदोलन केले आणि "ये तो बहोत अच्छे नेता है असे म्हणुन आपका सम्मान होगा" असा शब्दही दिला. आपल्या लेकीने एवढा मोठा सन्मान केल्याने प्रा. टी.पी. मुंडे अक्षरशः भारावून गेले.
       प्रा. टी.पी. मुंडे यांची राजकारणाची सुरुवात लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या सोबत झाली होती. दोघांनी अनेक आंदोलने केली एवढेच नव्हे तर अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांसोबत व्यासपीठही गाजवले. हे सर्व क्षण त्यांना आठवले. प्रा. मुंडे यांना जुना काळ जसाच तसा आठवला. दुसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर एवढा मोठा सन्मान झाल्याने त्यांचेही मन भरून आले. "मला आता कोणतीही अपेक्षा नाही. परळीची लेक मोठी होतेय तिला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज दिवसभर कार्यकर्त्यांमध्ये फक्त ना. पंकजाताई मुंडे यांनी जेष्ठ नेत्याचा सन्मान केल्याचीच चर्चा सुरू होती. 

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment