तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

सोशल मिडिया दुधारी शस्त्र आहे डाॅ. आसाराम लोमटे


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व भारतीय  सामाजिक शास्त्रे संशोधन संस्था आयोजित 'सोशल मीडियाचा समाजावरील प्रभाव' या विषयावर एकदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषक म्हणून बोलताना डाॅ.आसाराम लोमटे यांनी वरील मत व्यक्त केले.
          बिजभाषक म्हणून  पुढे बोलताना लोमटे म्हणाले, "समाजात प्रिन्ट मिडिया ,दृश्य मिडिया पासून सुरुवात झालेला मिडिया आज सोशल मिडिया  पर्यंत विकसित झालेला दिसतोय. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात प्रिन्ट मिडियाने 'शस्त्र' म्हणून काम केले तर स्वातंत्र्योत्तर काळात दृश्य मिडियाने मोठी क्रांती केली. आज टीव्ही वर फक्त खेळ, योगा, अध्यात्म, फिल्म, केवळ गाण्याचे, फक्त वेशभुषा, फक्त व्यायामासाठी...इ अनेक चॅनेल सुरू आहेत.  परंतू आज सोशल मिडियामूळे अभिव्यक्तीची प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे. स्मार्टफोन च्या माध्यमातून फेसबुक ,वाॅट्सप ,ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंकडेन या विविध सोशल नेटवर्किंगचा वापर करून लोक आपली अभिव्यक्ती करत आहेत हे एका अर्थाने खरे लोकशाहीकरण आहे'.
          सोशल नेटवर्किंग हे असे माध्यम आहे की याचा वापर आपण चांगल्या व वाईट कामासाठी करू लागलो आहोत. वाॅट्सपचे जातीय ग्रूप निर्माण होत आहेत ही चिंतेची बाब आहे. आज माॅबलिचिंग चे प्रकार होत आहेत. पण या नकारात्मक बाबीचा विचार करण्याची वेळ आज आली आहे. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून आपण खूप काही चांगले काम करू शकतोत. हे अनेक उदाहरण देऊन सांगितले. म्हणून सोशल मिडिया हे दुधारी शस्त्र आहे. याचा जपून वापर करणे आवश्यक आहे.
                याप्रसंगी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम प्राचार्य वसंत सातपुते, समन्वयक डाॅ. मारोती कच्छवे, सहसमन्वयक डाॅ. बापुराव आंधळे व इतर संशोधक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सखाराम कदम यांनी केले तर आभार डाॅ . मुक्ता सोमवंशी यांनी मानले. यावेळी सोनपेठ दर्शन च्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संपादक किरण स्वामी यांनी प्र.कुलगुरू व आसाराम लोमटे यांना सोनपेठ दर्शन साप्ताहिकाचे रंगीत अंक भेट म्हणून दिले.

No comments:

Post a Comment