तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

लेकीला मत म्हणजे विकासाला मत ―प्रा. टी.पी .मुंडे

. पंकजाताई यांच्या प्रचारार्थ दैठणा घाट ,खोडवा सावरगाव येथे जाहीर सभांना अलोट गर्दी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
 केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा आपल्या दारापर्यंत आणणाऱ्या भाजपा शिवसेना रिपाई महायुतीच्या उमेदवार ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना मत म्हणजे विकासाला मत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे नेते प्रा. टी.पी .मुंडे सर यांनी केले. ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ दैठणा घाट ,खोडवा सावरगाव येथे आयोजिलेल्या सभेत त्यांनी राष्ट्रवादी व आघाडीच्या खोटारडेपणाचा बुरखा ही फाडला.
      ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरलेल्या प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी काल सायंकाळी दैठणा घाट व खोडवा सावरगाव येथे सभा घेतल्या. दोन्हीही सभांना मतदारांनी अलोट गर्दी करून प्रा. टी.पी .मुंडे सर व अन्य भाजपा नेत्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी बोलताना भाजपा नेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी शेतकरी शेतमजूर व बेरोजगारांच्या हितासाठी ना. पंकजाताई मुंडे यांनी सत्तेच्या माध्यमातून विकासाची मोठी गंगा आपल्या दारात आणली आहे. प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हीच  परंपरा पुढे चालूच ठेवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना रिपाई महायुतीच्या उमेदवार ना. पंकजाताई गोपीनाथ राव मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. आपल्या लेकीला मत म्हणजे विकासाला मत असल्याचेही ते म्हणाले.
   राष्ट्रवादी व आघाडीचे उमेदवार त्यांचे नेते खरे कधी बोलल्याचे आपल्याला आठवत नाही. भावनिक होऊन मतदारांची दिशाभूल करायची व स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा हा त्यांचा 'धंदा' आहे अशा भामटेगिरी करणाऱ्या पासून मतदारांनी सावध राहावे असे आवाहन ही भाजपाचे नेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी केले.
     या दोन्ही प्रचार सभांना मतदारांनी मोठी गर्दी केली होती. याच दौऱ्यात भाजपा नेते प्रा. टी.पी. मुंडे सर व अन्य भाजपा व महायुतीच्या नेत्यांनी सौंदाना गुट्टेवाडी येथे भेटी देऊन मतदारांची प्रत्यक्ष संवाद साधला व ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या दौऱ्यात भाजपाचे जेष्ठ नेते प्रभाकर अण्णा फड ,रामराव गीते ,मधुकर मुंडे ,दैठणा घाट चे सरपंच अंकुश गुट्टे, उपसरपंच ज्ञानोबा गुट्टे, खोडवा सावरगाव चे सरपंच अरुण दहिफळे ,उपसरपंच गोविंद दहिफळे ,सौंदाणे याचे सरपंच सोपान फड, उपसरपंच गंगाराम फड, गुट्टेवाडी चे सरपंच बाबासाहेब गुट्टे ,उपसरपंच हरिराम दराडे, यांच्यासह अंकुश दहिफळे ,प्रभाकर दहिफळे, अशोक दहिफळे, इंद्रजीत दहिफळे ,ज्ञानोबा फड ,माणिक गुट्टे ,वैजनाथ गुट्टे ,गोविंद फड, आश्रुबा फड ,सूर्यकांत फड, एकनाथ गुट्टे ,हनुमंत गुट्टे ,बाबू गुट्टे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment