तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

नियोजनभवनात सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य जपावे :--- सामान्य निरीक्षक महावीरप्रसाद वर्मा       लोकशाहीला अभिप्रेत असलेले निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य व ‘प्युरिटी’ जपण्याचे काम सूक्ष्म निरीक्षकांनी करावे,  असे निर्देश निवडणूक सामान्य निरीक्षक महावीरप्रसाद वर्मा यांनी आज येथे केले.
       विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण नियोजनभवनात झाले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल, नोडल अधिकारी (कायदे व सुव्यवस्था व मनुष्यबळ व्यवस्थापन) डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा सूचना अधिकारी अरूण रणवीर आदी यावेळी उपस्थित होते. या प्रशिक्षणात 180 निरीक्षकांनी भाग घेतला.
       सामान्य निरीक्षक श्री. वर्मा हे सूक्ष्म निरीक्षकांना म्हणाले की, आपण निवडणूक कालावधीत आपल्या मूळ आस्थापनेवर कार्यरत नसून, निवडणूक आयोगाच्या डेप्युटेशनवर आहात याची जाणीव ठेवा. मतदारसंघांचे मुख्य निरीक्षक हे सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाहीत म्हणून त्यांना सहाय्य करण्यासाठी निरीक्षणाची महत्वाची जबाबदारी आपल्याकडे सोपवली आहे. त्यामुळे आपली जबाबदारी ओळखून गांभीर्याने काम करा.
         जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नवाल म्हणाले की, निवडणूक ही केवळ कागदावरची एक्झरसाईज नाही, याचे भान ठेवावे. प्रत्यक्ष प्रक्रियेची इत्थंभूत माहिती ठेवावी. कोणतीही तक्रार आली तर लगेच दखल घ्यावी. आपल्या कामाबद्दल किंवा तरतुदींबद्दल कुठलाही संभ्रम असेल तर प्रशिक्षणातच त्याचे निराकरण करून घ्यावे. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक बाब नियमानुसार पार पडते किंवा कसे, याच्या निरीक्षणाची महत्वाची जबाबदारी आपल्यावर आहे. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्रणा, मशिन वाटप, मॉकपोल, पथके या सगळ्या बाबींबद्दल काटेकोर माहिती ठेवावी. या काळात आपले पूर्ण लक्ष आपल्या जबाबदारीवर केंद्रित करा.  
_____---_-_________________--

        बुधवारी (ता. 9) सूक्ष्म निरीक्षकांचे रँडमायझेशन करण्यात येत आहे. डॉ. व्यवहारे व श्री. रणवीर यांनी यावेळी निरीक्षकांना विविध बाबींचे प्रशिक्षण दिले.

                          सूक्ष्म निरीक्षकांनी पडताळावयाच्या बाबी

          मॉक पोल प्रक्रिया, पोलिंग एजंट उपस्थिती, मतदान केंद्र प्रवेश प्रक्रिया, मतदार ओळखपत्रानुसार (11 पर्यायांसह) प्रवेश प्रक्रिया, मतदान प्रक्रियेची गुप्तता कायम राखणे आदी बाबी पडताळावयाच्या असून काहीही अनुचित बाब आढळल्यास सामान्य निरीक्षकांना तत्काळ कळवावी, असे निर्देश नोडल अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी यावेळी दिले

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment