तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

मतदार जनजागृतीचा जागर


- बाईक रॅली काढून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. ७: मतदार जनजागृती साठी जिल्ह्यात विविध उपक्रम  कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत आहे.त्यानुसार आज ७ ऑक्टोंबर रोजी बुलडाणा शहरात बाईक रॅली काढून मतदार जनजागृतीचा जागर करण्यात आला. या रलीचा शुभारंभ जिजामाता प्रेक्षागर मैदानावरून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शनमुग राजन यांनी हिरवी झेण्डी दाखवून केला. 
 सदर रॅली शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, एसबीआय चौक व शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. रॅली चा समारोप जिजामाता प्रेक्षगर येथे करण्यात आला. रॅलीत मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment