तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

भाजपला धक्का मांडेखेलचे भिमराव मुंडे राष्ट्रवादीत धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत आज होणार जाहीर प्रवेश
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.09.............. परळी तालुक्यातील मांडेखेल येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते भिमराव मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय केला असून, आज गुरूवार दि.10 ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे.

भिमराव मुंडे हे मागील अनेक वर्षांपासून भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. इतकी वर्ष निष्ठावंत म्हणून काम केल्यानंतरही पक्षाने कोणतीही संधी दिली नाही, उलट आयुष्यभर ज्यांच्या विरूध्द पक्षासाठी लढलो, संघर्ष केला त्यांनाच पक्षाने जवळ करून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचा निषेध म्हणून धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भिमराव मुंडे म्हणाले.

मांडेखेल येथे गुरूवारी सायंकाळी 06 वा. होणार्‍या जाहीर सभेत त्यांचा प्रवेश होणार असून, यावेळी माजी मंत्री पंडीतराव दौंड, जि.प.सदस्य संजय दौंड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.अनिल मुंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, ज्येष्ठ नेते विष्णुपंत सोळंके, प्रभुआप्पा तोंडारे, कृ.उ.बा.समितीचे सभापती गोविंदराव फड, काँग्रेसचे नेते वसंत मुंडे, माऊलीतात्या गडदे, विष्णुपंत देशमुख, मोहनराव सोळंके यांच्यासह नागापूर गटातील आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment