तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

दसरा मेळावा गोपीनाथ मुंडे ते पंकजाताई सावरगाव घाट एक पुण्यभूमीदसरा मेळावा (विजयादशमी) म्हटले की, लागलीच आठवते ते भगवानगड भगवानगडावरच्या दसरा मेळावा येथील राष्ट्रसंत भगवान बाबांची समाधी आणि दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे ओजस्वी आणि तेजस्वी मार्गदर्शन समाजाला दिलेला सामाजिक क्रांतीकारी संदेश यामुळे वंजारी समाजाबरोबर बहुजन समाजासाठी एक प्रेरणास्थान पडले ते भगवानगड आणि साहेबांच्या निधनानंतर  प्रेरणा आणि आदर्श पुण्यभूमी बनत आहे तो राष्ट्रसंत भगवान बाबांचे जन्मस्थळ असलेले पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट म्हणून ओळखू लागले.

आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मृत्यूनंतर दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होते की, काय असे वाटत होते. परंतु यांची कन्या आणि महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी साहेबांचा वारसा यशस्वीरित्या चालवता आहेत. सावरगाव घाट भगवान बाबांचे जन्मगाव एका संस्कारक्षम आणि धार्मिक प्रवृत्ती असलेल्या कुटुंबात भगवान बाबांचे बालपण वाढले भगवान बाबा जसजसे मोठे होऊ लागले तसे त्यांचे त्यांची समाजाच्या प्रति त्यांच्या शिक्षणाप्रती धडपड वाढू लागली.

    भगवानबाबांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते. त्यामुळे त्यांनी समाजाला शेती विका पण मुलांना शिक्षण द्या असा संदेश दिला. आपल्या ऊसतोड बांधवांच्या विकासासाठी शिक्षण किती महत्वाचा आहे. हे बाबांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी शाळा, वसतीगृह, वाचनालय काढली. यामधून हजारो मुले मुलींनी शिक्षण घेऊन उच्च पदावर काम करत आहेत.

    राष्ट्रसंत भगवान बाबांचे तेजस्वी रुप पाहून महाराष्ट्रात त्यांचे लाखो अनुयायी निर्माण झाले. बाबा समाज प्रबोधन करू लागले. यामुळे खेडोपाडी भगवानबाबांना दैवत मानन्यात येऊ लागले. बाबांनी त्यांची पहिली शाळा पाथर्डी तालुक्यातील भगवानगड येथे सुरू केली. या कार्यक्रमास तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. त्यांनी बाबांच्या या कार्याचे कौतुक केले.

        बाबांच्या निधनानंतर भगवानगडावर समाधी दर्शनासाठी लाखो अनुयायी प्रत्येक वर्षी दसऱ्याला येतात या दसऱ्याचे पुढे आणखी एक वैशिष्ट्य निर्माण झाले ते वैशिष्ट्ये म्हणजे दसरा मेळावा म्हणजे लोकनेते गोपीनाथ राव मुंडे यांचे मार्गदर्शन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून लोक भगवानगडावर येत होते. परंतु त्यांच्या निधनानंतर यांची कन्या ना.पंकजाताई मुंडे यांनी पुढे परळी पांगरी येथे गोपीनाथ गड निर्माण केला खा.प्रीतमताई मुंडे गोपीनाथ गड ते सावरगाव घाट भक्तीगड बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सावरगाव घाट आहे महाराष्ट्राचे एक आदर्श प्रेरणास्थान निर्माण झाले आहे सावरगाव घाट म्हणजे भक्तिगड आहे. असे ना.पंकजाताई सांगतात. सावरगाव येथील बारा एकर जागेत हे भक्तीगड उभा राहत असून येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे भव्य स्मारक  करण्यात आला. तसेच पाण्यावर बसुन ज्ञानेश्वरी वाचत असल्यामुळे  भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.  आज 8 ऑक्टोंबर रोजी खासदार प्रीतम ताई मुंडे यांच्या नेतृत्वात गोपीनाथ गड ते भगवान  भक्ती गड अशी भव्य दिव्य रॅली चे आयोजन केले आहे
 सावरगाव घाट येथे दसरा मेळावा भव्य आणि दिव्य अशा स्वरूपात होत आहे. कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील लाखो बहुजन बांधवांचा जनसागर आज सावरगाव येथे उसळणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती या मेळाव्यास बीड च्या खा.डॉ. प्रीतमताई मुंडे राहणार आहेत.
      या मेळाव्याचे आकर्षण आहे ते ना.पंकजाताई मुंडे यांचे भाषण त्या काय बोलतात याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे सावरगाव घाट (भक्तीगड) आज पुन्हा एकदा देशपातळीवर चर्चला आला आहे. त्याचे कारण म्हणजे हा दसरा मेळावा म्हणजे गोपीनाथराव मुंडे पंकजा मुंडे असंच अखंड प्रवास पुढे चालू राहणार हे पाहण्यासाठी लाखोंची गर्दी उसळणार आहे.

लेखक
प्राचार्य डॉ.बी.डी. मुंडे
जवाहरलाल नेहरू महाविद्यालय  परळी वैजनाथ

No comments:

Post a Comment