तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

नरेंद्र मोदींची परळीत ऐतिहासिक सभा ; रेकॉर्डब्रेक गर्दीने केले विजयावर शिक्कामोर्तब!


गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न 'बेटी पंकजा' पुर्ण करतेयं - पंतप्रधानांचे प्रशस्तीपत्र 

मोदींच्या येण्याने जिल्ह्याच्या विकासाची नवी पहाट - ना. पंकजाताई मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांचे विकासाचे स्वप्न "बेटी पंकजा" पुर्ण करीत आहे असे प्रशस्तीपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना. पंकजाताई मुंडे यांना देत त्या करीत असलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. मोदी यांच्या आज परळीत झालेल्या ऐतिहासिक सभेने ना. पंकजाताई मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. महायुतीचे सर्वच उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. तर मोदी यांच्या येण्याने जिल्ह्याच्या विकासाची नवी पहाट झाली असुन विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधी कमी पडू देणार नाहीत असा विश्वास ना. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला. 

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीड जिल्ह्य़ातील महायुतीच्या उमेदवारांसाठी वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील मैदानावर जाहीर सभा घेतली. सभेला अक्षरशः जनसागर उसळला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझे मित्र दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कर्मभूमीत आल्याचा आनंद होत आहे. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे विकासाचे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे पूर्ण करीत आहेत. मराठवाडा हा कायम दुष्काळी राहिला आहे. मात्र आगामी काळात दुष्काळ मुक्त मराठवाडा घडवायचा आहे. " हर घर जल" या संकल्पनेने दुष्काळावर मात करायची आहे. मराठवाड्यात जलसंधारण, जलसिंचनाचे प्रकल्प राबवून गोदावरीचे पाणी आणायचे आहे. त्यासाठी वाॅटर ग्रीड योजना राबवून मराठवाडा पाणीदार करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. 

थकलेल्या लोकांची गरजच काय?

यावेळी मोदी यांनी कमजोर विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना पराजीत भावनेने पछाडले आहे. ते दोघेही आता थकुन गेले आहेत ते काय तुमचा विकास करणार? असा सवाल करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्वार्थ शक्तीने प्रभावीत आहेत तर भाजप महायुती कर्मशक्तीने प्रभावीत आहे. जनता नेहमी कर्मशक्तीवर प्रेम करते असे सांगून बीड जिल्ह्याने नेहमी महायुतीला साथ दिली आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून तर विरोधक गर्भगळित होतील असे सांगून ते म्हणाले की, महायुतीकडे जीव लावून काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडे भ्रष्टाचारी कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडील चांगले लोक त्यांना सोडून गेल्याने तेथे केवळ थकलेले आणि पराभूत लोक राहिले आहेत ते काय तुमचा विकास करणार असा सवाल करून महायुती सरकारने पाच वर्षांच्या कालावधीत अतिशय चांगले काम केले आहे. जनता कामाची पावती नक्की देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ३७० कलमाचा विरोध करणाऱ्या विरोधकांना  धडा शिकविण्याची पहिली संधी  महाराष्ट्राला आली असून आपण यांना धडा शिकविणार का असा प्रश्न उपस्थितांना करून देश भावना विरोधी काम करणारांना धडा शिकविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. कलम रद्द करण्याचा निर्णय आम्ही राजनितीसाठी नाही देशहितासाठी घेतला आहे आणि अपेक्षित बदल घडताना दिसत आहे. विरोधकांनी यावरून फार टीका केली. पण जनतेने मात्र डोक्यावर निर्णयाचे स्वागत केले आहे आणि त्याची पावती या निवडणुकीत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
        गेल्या पाच वर्षात गॅस, घरे, शौचालय, वीज कनेक्शन आदीबाबत सरकारने काम केले असून पुढील पाच वर्षात "जल जीवन मिशन" वर काम करणार असून घराघरात पाणी ही संकल्पना राबविली जाणार असून त्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात असल्याचे ते म्हणाले. पीक विमा आणि वेगवेगळ्या अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम आम्ही केले असुन साठ वर्षे पूर्ण झालेल्या अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, घरकाम करणारे मजुर यांना ३०० रूपये पेन्शन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले तुमच्या पैशावर डल्ला मारीत होते. आम्ही थेट बँक खात्यात पैसे देत असल्याने भ्रष्टाचार कमी होऊन तुम्हाला योग्य रक्कम मिळत आहे. आगामी काळातही शेतकरी आणि मजुरांसाठी विविध योजना राबवायच्या आहेत. 

पंकजाताईंच्या कामाचे कौतुक

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे परळी - बीड - नगर रेल्वे मार्ग पुर्ण करण्याचे स्वप्न त्यांची मुलगी पुर्ण करीत आहे. गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाची स्थापना करून त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. बीड जिल्ह्य़ात रस्ते, पाणी आल्याने उद्योगासाठी चांगले वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे आगामी काळात मोठे उद्य

No comments:

Post a Comment