तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

बँक ऑफ बडोदाने 'बडोदा किसान पंधरवडा 'चे आयोजन


बदनापूर प्रतिनिधी बालाजी फुकटे

सर्वांसाठी विस्तारित आर्थिक सेवा पुरवण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना चालनादेण्यासाठी बँक ऑफ बडोदाने 'बडोदा किसान पंधरवडा 'चे आयोजन केले असून त्याअंतर्गत शेती क्षेत्रातील कर्जाचे प्रमाण वाढवण्याचा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा हेतू आहे. 'बडोदा किसान दिवस'आपल्या शेतकऱ्यांचे धैर्य आणि उत्साह साजरे केले जाते तसेच यानिमित्ताने शेती आणि ग्रामीण भागातील कर्जाचे प्रमाण वाढवण्यास चालना देण्याचे उद्दिष्ट आहे.'बडोदा किसान पखवाडा' हा  हा उपक्रम जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बँकेच्या सेवांशी जोडण्यास चालना देतो.'बडोदा किसान पखवाडा'
या अभिनव उपक्रमा अंतर्गत स्वयं सहायता गटांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या अंतर्गत स्वयं सहायता गटांना कर्जाचे वाटप करण्यात आले. यावेळी आपले विचार व्यक्त करत बँक ऑफ बडोदा केळीगव्हाण चे शाखा व्यवस्थापक श्री. अजय कुमार म्हणाले, 'बँक ऑफ बडोदामध्ये आम्ही शेती क्षेत्र आणि ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण व प्रवर्तकीय काम करत बँकेचा वारसा जपत आहोत. भारत सरकार शेती क्षेत्राकडे पूर्ण लक्ष देत नवे उपक्रम सुरू करण्यासाठी सातत्याने काम करत आहे.उत्पादनक्षमता, शेतकऱ्यांची आवड जपणे, त्यांची उत्पन्न पातळी वाढवून जीवनमानाचा दर्जा उंचावणे हे त्यामागचे
सरकारचे उद्दिष्ट आहे. बँक ऑफ बडोदाचे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सरकारचे प्रयत्न सुसंगत असून ते शेतकऱ्यांना प्रत्येक
टप्प्यावर सक्षम करण्याच्या, त्यांची विकास पातळी उंचावण्याच्या आणि उत्पादनक्षमतेच्या राष्ट्रीय ध्येयाला पाठिंबादेण्याच्या उद्दिष्टाने आखलेले आहेत. भारत सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे आणि सरकारच्या या उपक्रमाला यश मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वप्रकारचे प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. त्याचप्रमाणे
शेतकऱ्यांमध्ये आर्थिक साक्षरता पसरवणेही महत्त्वाचे आहे, ज्यामुळे त्यांना आपल्या शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी
सावकाराच्या पकडीतून सुटून राष्ट्रीयकृत बँकांना संपर्क साधता येईल.'बँक ऑफ बडोदाने या ध्येय मोहिमेची माहिती देण्यासाठी माहितीपर पुस्तके, परिपत्रके छापली आहेत तसेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेती कर्ज उत्पादनांवर आधारित पुस्तिका तयार केली आहे. त्यांचा शेती क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी माध्यम तयार करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय सुधारण्यासाठी उपयोग होईल.
आयोजन बँक ऑफ बडोदा शाखा केळीगव्हाण चे शाखा व्यवस्थापक श्री अजय कुमार यांनी केले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री विद्यानंद गुप्ता व श्री संतोष खंडिजोड बँक ऑफ बडोदा शाखा व्यवस्थापक जालना , श्री सौरव दास, श्री म्हस्के, श्री बाबासाहेब मदन सरपंच केळीगव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment