तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

जनतेसाठी संघर्ष करणाऱ्या प्रा टी पी मुंडे यांच्या जनआंदोलनात काँग्रेसचे उंदीर कोणत्या बिळात लपले होते ; सूर्यकांत मुंडे यांचा पलटवारपरळी वैजनाथ ( प्रतिनिधी) :-
परळी विधानसभा मतदारसंघ व शहरात जनतेवर होणाऱ्या अन्यायाला प्रा टी पी मुंडे सर यांनी नेहमीच रस्त्यावर उतरून वाचा फोडली त्यांच्या या जन संघर्षाच्या वेळी आता डोके वर काढणारे काँग्रेसचे तथाकथित उंदीर कोणत्या बिळात लपले होते याचे उत्तर प्रा टी पी मुंडे सर यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांनी द्यावे असे आव्हान मार्केट कमिटीचे संचालक सूर्यकांत मुंडे यांनी देऊन आता चिखलफेक करण्याचे नाटक थांबवा नाहीतर आमच्याकडेही तुमच्या कुकर्माचे गाठोडे आहे असा इशाराही त्यांनी दिला.


     काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस  प्रा टी पी मुंडे सर यांनी व त्यांच्या समर्थकांनी घेतलेल्या भाजपा प्रवेशाच्या भूमिकेमुळे परळी मतदारसंघ व बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात खळबळ उडाली राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या या निर्णयामुळे सर्वत्र बदलत्या राजकीय समीकरणाची चर्चा जनतेत रंगली आहे.


     याच पार्श्वभूमीवर व कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून मी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदाचा तसेच प्रा विजय मुंडे यांनी  विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आमच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी, माजी नगरसेवक ,सोसायटीचे चेअरमन यांनीही काँग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केला.


     बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवणाऱ्या प्रा टी पी मुंडे सर यांच्या नव्या भूमिकेमुळे परळी मतदारसंघ व बीड जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप झाला या भूकंपाची चाहूल लागल्यानेच स्वतःला काँग्रेसचे म्हनऊन घेणारे काही उंदीर बिळातून बाहेर येऊन तोंड सुख घेत आहेत वास्तविक पाहता प्रा टी पी मुंडे सर यांनी गेली तीस वर्ष जनतेसाठी संघर्ष केला आहे काँग्रेस कडून नेहमीच अन्याय होत असल्यानेच व काँग्रेस पक्ष बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेतेच चालवत असल्याचे जाणवल्याने आम्ही पक्ष त्याग करून भाजपात प्रवेश करण्याची भूमिका उघडपणे घेतली असेही सूर्यकांत मुंडे यांनी म्हटले आहे.


    प्रा टी पी मुंडे सर यांच्यासारख्या तेजस्वी नेतृत्वावर आरोप करताना संजय दौंड ,वसंत मुंडे व अन्य तथाकथित काँग्रेसजनांनी स्वतःच्या झोळीत वाकून बघावे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दौंड यांनी उघडपणे भाजपाला सहकार्य केले होते त्यावेळी संजय दौंड यांचा आघाडीचा धर्म व काँग्रेस प्रेम कोठे गेले होते .वसंत मुंडे यांनी तर  स्वतःला  तपासून  पाहण्याची  गरज आहे  ज्यांना स्वतःचे  घर , गाव  संभाळता येत नाही  त्यांनी  इतरांना  राजकारण  शिकऊ नये स्थानिक  जनतेच्या प्रश्नात  ते  कोठे असतात  असा सवाल उपस्थित केला.


     सर्वसामान्य जनतेच्या संकटात नेहमीच प्रा टीपी मुंडे सर रस्त्यावर येऊन संघर्ष करतात काँग्रेस पक्षाकडून होणारा अन्याय व समर्थकांचा आग्रह यामुळेच त्यांनी भाजपात प्रवेश करण्याची भूमिका घेतली आहे परळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनीच नव्हे तर जनतेनेही त्यांच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत व भाजपा महायुतीचे पारडे जड झाले आहे त्यामुळेच पोटशूळ उठलेले व आतापर्यंत बिळात लपलेले हे उंदीर  आता त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करून दलाली खाण्याचे काम करीत आहेत का ?असा सवाल या मतदारसंघातील मतदारच उपस्थित करीत आहेत याची आठवण करून देतानाच सूर्यकांत मुंडे यांनी आता तरी गप्प बसा, खोटे आरोप करू नयेत असा सबुरीचा सल्ला दिला व वळवळ केली तर तुमच्या पापाचे गाठोडे जनतेसमोर आणावे लागेल असा इशारा दिला.

No comments:

Post a Comment