तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन ऊत्साहात साजरादेविदास भगत यांनी दिले विहाराला लोखंडी गेट दान

(फुलचंद भगत)
मंगरूळपीर-तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन बौध्द ऊपासक आणी ऊपासिका यांनी मोठ्या ऊत्साहात साजरा केला असुन मान्यवरांनी विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मनोगतातुन प्रकाश टाकला.
            भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार बोधीसत्व परमपुज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपुर येथे बौध्द धम्माची दिक्षा घेवून आपल्या समवेतील लाखो अनूयायांनाही दिक्षा दिली होती तो दिवस विजयादशमीचा होता म्हणून या दिवसाचे औचित्य साधुन पिंपळखुटा येथे बौध्द बांधवांनी पंचशिल ध्वजारोहन करुन बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करुन बुध्द मुर्तीला फुले वाहिली.सामुहीक वंदना घेवून विद्दार्थी आणी मान्यवरांनी महामानव बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक देविदास भगत यांनी विहाराला लोखंडी गेट भेट दिल्या त्यानिमित्य त्यांच्या परिवाराचा बौध्द विहार समितीकडुन सत्कार करन्यात आला.समाजातील शिकलेले आणी नोकर्‍यावर असणारांनी लोकवर्गणीच्या माध्यमातुन विहाराच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरुन संघटनात्मक कार्य घडुन समाजहितांची कामे होतील असे आवाहन समितीकडुन करन्यात आले.आरक्षणाचा फायदा घेवून शिकले व नोकरीवर लागले पण गावाकडे ढूंकुन पाहायलाही वेळ नसल्याची खंतही यावेळी व्यक्त करन्यात आहे.भगत परिवाराचा आदर्श ईतर बौध्द बांधवांनी घ्यावा असेही मान्यवरांनी सांगीतले.या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला नारायण भगत,मैनाबाई भगत,काशिराम पडघान,पुंडलिक पडघान,डिगांबर पडघान,राजाभाऊ पडघान,प्रभाकर डोंगरदिवे,प्रदिप सोनोने,लक्ष्मण पडघान,प्रल्हाद भगत,मायाबाई भगत,सिध्दार्थ  पडघान,हर्षल पडघान,रोशन पडघान,रघुजी भगत,चंद्रमणी भगत,विनोद पडघान,जनार्धन पडघान,संजय भगत,ॠषीकेश पडघान,भारत पडघान,पुंडलिक डोंगरदिवे,वैभव विर यांचेसह बौध्द बांधव आणि बहूसंख्य गावकर्‍यांचीही ऊपस्थीती होती.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a Comment