तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 October 2019

केंद्रात व राज्यात सरकारचे काम चांगले-उद्धव ठाकरेअरुणा शर्मा


पालम :- मोदी सरकारचे केंद्रात व राज्य सरकारने केले जनहिताची काम अतिशय चांगले असल्याचे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालम येथील जाहीर सभेमध्ये केले.                                        गंगाखेड विधानसभेचे भाजप-शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ रविवारी दुपारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यात आली यावेळी व्यासपीठावर परभणीची खासदार संजय जाधव, उमेदवार विशाल कदम, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, रामप्रभू मुंढे, विठ्ठल रबदडे डॉक्टर सुभाष कदम, श्यामसुंदर मुंडे, गणेशराव रोकडे , शिवसेनेचे तालुका प्रमुख हनुमंत पोळ, शिवसेनेचे युवा सेना प्रमुख ओम सिरस्कर आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला उद्धवजी ठाकरे पुजन करुन पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपस्थित शिवसेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले कि, मोदी सरकारने केंद्रात राज्य सरकारने महाराष्ट्रात जनहिताचे चांगले काम केलेले आहे .राज्यात शिवसेनेचाही सहभाग असून काही मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपात वैचारिक मतभेद निर्माण झाले होते. राज्य सरकारने शेतकऱ्यांची छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना जाहीर केली आहे ती मला पटलेली नाही, मला कर्ज मुक्ती हवी आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात, उद्धव ठाकरे यांना शेतीतले काही कळत नाही त्यांच्या बरोबर आहे. मला खरंच शेतीतलं काही कळत नाही, मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसतात. पंतप्रधान पिक विमा योजनेच्या बद्दल बोलताना ते म्हणाले की पिक विमा भरतेवेळी सरकारने एजंट लावलेले आहेत मात्र शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले तर भरपाई देण्यासाठी विमा कंपनीचे एजंट शेतकऱ्यांना भेटत नाही पिक विमा कंपनीचे गावात तालुक्यात अथवा जिल्ह्यात कोठेही कार्यालय नाही. यामुळे शेतकऱ्यांनी तक्रारी कोठे मांडाव्यात याबाबतचा प्रश्न मलाही पडतो. भविष्यात राज्यात युतीचे सरकार येणार आहे. विशाल कदम च्या माध्यमातून तरुण युवक विधानसभेमध्ये पाठवा अपेक्षा व्यक्त करतो. युतीचे सरकार आल्यानंतर संपूर्ण कर्जमुक्ती व पिक विमा योजनेच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात येतील असे आश्वासन यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पदुदेवा जोशी यांनी केले. या सभेला मतदार संघातील पालम-पूर्णा व गंगाखेड तालुक्यातून शिवसेनेचे कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

No comments:

Post a comment