तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

टि - २० च्या आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅट्रीक घेणारे गोलंदाज
                 टि-२० क्रिकेट आजकाल प्रत्येकाच्या पचनी पडत असताना त्यात घडणाऱ्या घडामोडी सर्वांच्या काळजाचे ठोके चुकवत असतात. कोणत्याही फलंदाजाने केलेली घणाघाती फटकेबाजी, गोलंदाजाने केलेली कंजूष गोलंदाजी, क्षेत्ररक्षकाने टिपलेला अफलातून झेल, फलंदाजाचे शतक, गोलंदाजांचे पाच बळी हे सर्व क्षण मनाला मोहून टाकतात पण एखादया गोलंदाजाने फलंदाजी करणाऱ्या संघाच्या डावात विघ्न आणून त्यांच्या तंबूत खळबळ माजवून हॅट्रीक घेतली तर त्या क्षणाला सामन्याचा आस्वाद घेणाऱ्यांच्या आनंदाला, सिमाच उरत नाही. तर फलंदाजी करणाऱ्या संघाचे दुःखही कोणीच सावरू शकत नाही. आजच्या लेखात आपण टि २० आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅट्रीक घेणाऱ्या गोलंदाजांच्या जादूई कामगिरीवर एक नजर टाकू या.

              टि २० क्रिकेट मध्ये आतापर्यंत केवळ गोलंदाजांना हॅट्रीक घेता आली आहे. अशी अकल्पित कामगिरी करणारा गोलंदाज आहे ऑस्ट्रेलिया जलदगती गोलंदाज ब्रेट ली. त्याने १६ सप्टेंबर २०o७ रोजी केपटाऊन येथे बांगलादेशच्या शाकीब अल हसनला गिलख्रिस्टकरवी झेलबाद केले, मुश्रजा मुर्तझालाा त्रिफळचित केले तर अलोककपालीला पायचितच्या जाळ्यात घेरुन सलग तीन चेंडूवर तीन बळी घेणारा निव्वळ आंतरराष्ट्रीय टि-२० सामन्यातीलच नव्हे तर टि-२० विश्वचषकातला पहिला गोलंदाज ठरला.

             २ सप्टेंबर २००९ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडीयमवर न्यूझिलंडच्या जेकब ओरमने श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला स्वतःच झेलचीत केले, नंतर लसिथ मलिंगाला ब्रेंडन मॅकलमकडे झेल देण्यास भाग पाडले. पुढच्याच चेंडूवर नुवान कुलशेखरा ब्रुमच्या हाती झेल झेल देऊन परतला.

               न्यूझिलंडच्याच टिम साऊदीने इडन पार्क, ऑकलंडला २६ डिसेंबर २०१० रोजी पाकिस्तानच्या युनुसखानला ब्राऊनलीकडे झेल द्यायला मजबूर केले. नंतर मोहम्मद हाफिजही मॅकलेघनला झेल सोपवून परत गेला. तर पुढील चेंडूवर उमर अकमल पायचित झाला. या प्रकारे या क्लबमधील तो तिसरा गोलंदाज बनला.

             या अनोख्या क्लबचा चौथा सदस्य आहे श्रीलंकेचा थिसारा परेरा. १२ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएससीए इंटरनॅशनल स्टेडीयम कॉम्पलेक्स रांची येथे भारताविरुद्ध ही सनसनाटी हॅट्रीक साधली. सर्वात प्रथम त्याने सेनानायकेच्या हातून हार्दिक पंड्याचा काटा काढला, मग चामीराच्या हातून सुरेश रैनाला माघारी धाडले शेवटी युवराजसिंग गुण तिलकेच्या हाती प्रसाद देऊन निघून गेला.

             पुन्हा एकदा श्रीलंकेच्याच लसिथ मलिंगाने हॅट्रीकचा चमत्कार करताना ६ एपिल २०१७ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडीयमवरची दुसरी हॅट्रीक बांगलादेशविरूद्ध नोंदविली. मलिंगाने मुशीफिकुर रहीम व मुश्रफा मुर्तझा यांचे त्रिफळे उडविले तर मेहदी हसनला पायचित केले.

               अबुधाबीच्या शेख झैद क्रिकेट स्टेडीयमवर २७ ऑक्टोबर २०१७ रोजी श्रीलंकेविरूद्ध पाकिस्तानी गोलंदाज फहीम अश्रफने इसरू उडानाला अझरअलीच्या हातून झेलबाद केले. पुढच्याच चेंडूवर महेला उदावत्ते बाबर आझमकडे झेल देऊन परतला.नंतर दासून शनाका पायचित केले. तो या माळेतला सहावा मणी ठरला.

               अफगाणिस्तानच्या राशिद खानने आयर्लंड विरूध्द डेहराडूणच्या राजीव गांधी स्टेडियमवर १९ फेब्रुवारी २७१९ रोजी एक वेगळीच हॅट्रीक नोंदवून इतिहास घडविला. त्याने चार आयरीश फलंदाजांना सलग चार चेंडूवर बाद करून स्वतःला इतिहास पुरूष बनविले. प्रथम केव्हीन ओब्रायन शफीक उल्लाहला झेल देऊन परतला, नंतर जॉर्ज डॉ करेल नबीकडे चेंडू कोलून बाद झाला. मग शेन गेटकेट शफिक उल्लाहला हॅट्रिक मधला दुसरा झेल देऊ परतला. तर चौथा गडी सिमी सिंग पायचित झाला.

                 लसिथ मलिंगाने आपली टि-२oतील दुसरी हॅट्रीक करताना राशिद खानच्या सलग चार बळींसह हॅट्रीकचा पराक्रम करण्याच्या कारनाम्याची पुनरावृत्ती केली. ६ सप्टेंबर २०१९ रोजी कँडी येथे न्यूझिलंडच्या कॉलिन मनरोला त्रिफळा, हमिश रुदरफोर्डला पायचित, कॉलीन डी ग्रँड होमला त्रिफळा तर रॉस टेलरला पायचित असे स्वतःच्याच हिमतीवर सलग बाद करून विशेष हॅट्रीक साधली. विशेष म्हणजे एक दिवशीय सामन्यातही सलग चार बळींची हॅट्रीक त्याच्या नावे असून वनडेत ३ टि २० मध्ये २ आशा पाच हॅट्रीक त्याने साधल्या आहेत.

                   या समुहातलााा नववा शेवटचा सदस्य आहे पाकिस्तानचा मोहम्मद हस्नेन. त्याने नुकताच ५ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरूध्द लाहोरच्या गद्दाफी स्टेडीयमवर हि कामगिरी साधली. भानुका राजपक्षे पायचित, दासुना शनाका झेल उमर अकमल, व शेहान मुबारक झे मोहम्मद शेहजाद अशी त्याची क्रमवारी होती.आपला दुसराच सामना खेळणाऱ्या हसनेनने हॅट्रीक घेऊन टि२०त सर्वात कमी वयाचा हॅट्रीक घेणारा गोलंदाज बनला.

                 आश्चर्याची बाब म्हणजे ही हॅट्रीक झाल्या माहिती

No comments:

Post a comment