तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 24 October 2019

जनतेने दिलेला कौल नम्रपणे स्वीकारते, यापुढे जनतेच्या सेवेसाठी कायम काम करणार - ना. पंकजाताई मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. २४ ------- परळीतील जनतेने दिलेला कौल नम्रपणे स्वीकारत भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी यापुढे जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी कायम काम करत राहीन, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले 

त्या पुढे म्हणाल्या, मतदारसंघात चांगलं वातावरण होतं, विजयाची खात्री होती, पण हा पराभव मलाच नव्हे, तर ज्यांचा विजय झालाय त्यांनाही अनाकलनीय आहे, मी गोपीनाथ मुंडे यांची कन्या आहे, पराभवाने खचून जाणार नाही, जनतेचा कौल मान्य करते.

No comments:

Post a comment