तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

तुळशीराम पवार यांचा आज खा. शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

(प्रतिनिधी) :- 
महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार यांनी आज खा.
शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत अंबाजोगाई येथे जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाने परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना फायदा होणार आहे.

शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांचे निकटवर्तीय आणि बीड जिल्हाध्यक्षपदी कार्यरत असलेल्या तुळशीराम पवार यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करू, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. परळी मतदारसंघात धनंजय मुंडे हे
प्रत्येकाच्या कामाला सदैव तत्पर असतात. त्यामुळे आपण त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या प्रवेशाने परळी विधानसभा मतदारसंघात
धनंजय मुंडे यांना बळ मिळाले असून शिवसंग्राममधून आलेल्या या नेत्यामुळे निश्चित फायदा होईल असे बोलले जात आहे.

No comments:

Post a comment