तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

सर्व सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना गिळणारा शार्क मासा भाजपाच्या गळाला ; काँग्रेस पदाधिकार्‍यांचा प्रा.टी.पी.मुंडे व समर्थकावर हल्लाबोल, तालुकाध्यक्षपदी अ‍ॅड.अनिल मुंडे यांची निवड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि 6 -------- काँग्रेस पक्षाने अनेक नेते मोठे केले त्यापैकीच परळीचे प्रा.टी.पी.मुंडे त्यांना काँग्रेसने दोनवेळा विधानसभेचे तिकीट देवून परळी मतदार संघातील सर्व काँग्रेसपक्ष ताब्यात दिलेला असतांना त्यांनी पक्ष वाढविण्या एैवजी वैयक्तीक स्वार्थापोटी पक्ष रसातळास आणला. अशा या परिस्थितीत त्यांनी पक्ष सोडणे याच्याशी आमचे काही देणे घेणे नाही. परंतु पक्षावर आरोप करणे चुकीचे असून सर्व सामान्य कार्यकर्त्यांची गळचेपी करत हुकूमशाही  गाजवणारा शार्कमासा भाजपाच्या गळाला लागला असून त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला असल्याचा हल्लाबोल काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अ‍ॅड. अनिल मुंडे यांची निवड केली असल्याचे जाहिर करण्यात आले.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर परळीतील काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी आज पत्रकार परिषद घेवून काँग्रेस जिवंत असल्याचे सांगितले. परळी काँग्रेसनेते संजय दौंड, जेष्ठ नेते बाबुराव मुंडे, वसंत मुंडे, शहराध्यक्ष बाबु नंबरदार, नुतन तालुकाध्यक्ष अ‍ॅड.अनिल मुंडे यांनी प्रा.टी.पी.मुंडे यांनी केलेल्या हल्ल्याला प्रतिउत्तर दिले.

 प्रा.मुंडे यांना काँग्रेसने 1999, 2014 साली दोन वेळा विधानसभेची उमेदवारी दिली होती. परंतु त्यांनी या काळात अनेक वेळा पक्षांतर करुन आपण काँग्रेसशी एकनिष्ट नसल्याचे दाखवून दिले. अशा काळात ही काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी परळी मतदार संघातील पक्षाची सर्व सुत्रे त्यांच्या हातात दिलेली होती. दि.5 ऑक्टोबर रोजी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना बोलावले. त्याच मेळाव्यात भाजपाच्या उमेदवार ना.पंकजाताई मुंडे अचानक हजर झाल्या यामुळे अनेक कार्यकर्त्यांना हे रुचले नाही. याच मेळाव्यात प्रा.मुंडे यांनी आपल्या समर्थकासह भाजपात जाण्याची घोषणा केली. परंतु ही घोषणा करतांना काँग्रेसने अन्याय केल्याचे सांगण्यात आल्याने आम्ही आश्‍चर्य व्यक्त करत आहोत.

प्रा.मुंडे हे पक्ष सोडून गेल्याने सर्व सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना विजयी करण्यासाठी तन-मन-धनाने काम करणार असल्याचे सांगितले. तसेच येणार्‍या काळात काँग्रेसची पक्षबांधणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

 या पत्रकार परिषदेस परळी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पुढील काळात परळी मतदार संघातील सर्व कार्यकर्ते संजय दौंड यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.

अ‍ॅड.अनिल मुंडे यांची निवड
काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सद्स्या सौ.रजनीताई पाटील, जेष्ठनेते अशोक पाटील यांच्याशी संपर्क करत तसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी व वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून त्यांच्या संमतीने काँग्रेसच्या परळीच्या तालुकाध्यक्षपदी अ‍ॅड.अनिल मुंडे यांची निवड करण्यात आली असल्याचे संजय दौंड यांनी सांगितले.

No comments:

Post a comment