तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 October 2019

राष्ट्रवादी काँग्रेसला दणका; माजी पं. स. सदस्य बाबासाहेब काळे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश ; ना. पंकजाताई मुंडे यांना ताकद देऊन विक्रमी मताधिक्य देणारपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि. १३ ----- राष्ट्रवादी काँग्रेसला जोराचा धक्का देत पंचायत समितीचे माजी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब काळे यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना ताकद देऊन विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला आहे. काळे यांच्या प्रवेशाने धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसला आहे. 

  बाबासाहेब काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. बाजार समितीचे माजी उप सभापती असलेले काळे हे सध्या सिरसाळा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून त्यांनी ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आज भाजपात प्रवेश केला. ना. पंकजाताई मुंडे यांच्यामुळे मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट झाला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना सत्तेवर बसवायचे आहे, त्यासाठी आपण त्यांना ताकद देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी काळे यांचे भाजपात स्वागत केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा टी पी मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, सतीश मुंडे, प्रा. विजय मुंडे, रामराव गिते, चंद्रकांत देवकते आदीं उपस्थित होते.

No comments:

Post a comment