तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

साईबाबांच्या शिर्डीत काय आहे

 विजयादशमीचं महत्त्व? 
बाळू राऊत प्रतिनिधी 
शिर्डी, :  'दसरा' अर्थात विजयादशमी. सत्याचा असत्यावर विजय अधोरेखित करणारा सण म्हणजे 'दसरा'. याच दिवशी रामानं रावणाचं दहन केलं होतं. आणि महाभारतातही याच दिवशी पांडवांनी आपली शस्त्र शमीच्या झाडातून पुन्हा बाहेर काढली होती असं मानलं जातं. त्यामुळे याच दिवशी शस्त्रपूजनही केलं जातं. देशभरात दसऱ्याचा जल्लोष असून साईबाबांचा १०१ वा पुण्यतिथी सोहळा शिर्डीत साजरा होत आहे. चार दिवस चालणा-या विजयादशमी उत्सवाला सोमवारपासून सुरूवात झाली.  उत्सवाच्या दुसर्‍या मुख्य दिवशी, साईबाबांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी असल्याने साईमंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं.
विजयादशमीच्या दिवशी १९१८ साली साईबाबांनी आपला देह सोडला होता तेव्हापासून दरवर्षी पुण्यतीथी उत्सव साजरा करण्यात येतो. शिर्डीत वर्षभरात मुख्य तीन उत्सव साजरे केले जातात. गुढीपाडवा, रामनवमी आणि विजयादशमी. या तीनही उत्सवात साईभक्तांची मोठी गर्दी शिर्डीत असते. आजही हजारो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत तर साईमंदिर आकर्षक फुलांनी आणि सुंदर विद्यूतरोषणाईने सजलं आहे.

मुंबईतील द्वारकामाई भक्त मंडळाने साईमंदिर परीसरात उभारलेले सुंदर प्रवेशद्वार सर्वांचे लक्ष वेधून घेतात.  पहाटे काकड आरतीने उत्सवाच्या मुख्य दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून साईबाबांचा आराधना विधी, भिक्षा झोळी यासह विविध कार्यक्रमांची रेलचेल  शिर्डीत असणार आहे. बाबांच्या दर्शनासाठी हजारो भाविक शिर्डीत येत असल्याने सर्वांना बाबांचे दर्शन घेता यावे यासाठी साईमंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. 
विजयादशमीच्या दिवशी शस्त्राची पूजा
विजयादशमीच्या दिवशी पांडवांनी आपली शस्त्रे शमी झाडाच्या ढोलीतून बाहेर काढली आणि ते युद्धासाठी सज्ज झाले. म्हणून विजयादशमीच्या दिवशी शस्त्राची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. सीमोल्लंघनाचा अर्थ पांडव काळातील शस्त्र हाती घेऊन बाहेर पडण्याचा नसून आजच्या समाज जीवनातील विस्कटलेल्या चौकटी पुन्हा सांधण्याचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आणि पांडवांच्या काळाला साजेस असंच काहीसं सिमोल्लंघन सध्या राज्यात दिसत आहे.

No comments:

Post a Comment