तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

ताई, तुमच्या नेतृत्वाची परळीला गरज !, विकासकन्येला साथ देण्याचे परळीतील वकीलांनी दिले अभिवचन ; जनतेच्या न्यायालयातील माझी स्वच्छ प्रतिमा विरोधकांना सहन होत नाही - ना पंकजाताई मुंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
    परळी न्यायालयासाठी आपण स्वतंत्र इमारत दिली, वकील संघासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साधला,  तुमच्या नेतृत्वाची परळीला आज गरज आहे असे सांगत विकासकन्येला साथ देण्याचे अभिवचन शहरातील वकीलांनी दिले. दरम्यान, जनतेच्या न्यायालयात मी स्वच्छ आणि निष्कलंक आहे, माझी प्रतिमा विरोधकांना सहन होत नाही, असे भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या. आयडियल परळी करण्यासाठी आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.   
      
  ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळी वकील संघाच्या सभागृहात आज शहरातील वकील बांधवांची बैठक झाली. यावेळी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांनी वकिलांशी मुक्त संवाद साधला. वकीलांनीही त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.  ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, परळीला जिल्हा न्यायालय यावे यासाठी मी प्रयत्न करणार असुन त्यासाठी स्वतंत्र इमारत उभारली जाणार आहे. वकील संघाने नेहमीच मला समर्थन दिले आहे ते पुढेही राहील असा मला विश्वास आहे. मी परळी मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला आहे. परळी ते अंबाजोगाई रस्ता रखडला आहे त्यात माझा दोष नाही. पण विरोधकांकडून काम रोखण्याचा प्रयत्न करून मला बदनाम केले जात आहे पण तरीही या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. एक अपवाद सोडला तर गावोगावी रस्ते केले आहेत. विकास अगदी सर्व सामान्यांच्या दारापर्यंत पोहोंचवला आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गट चळवळ गतीमान केली आहे.

म्हणून माझी प्रतिमा सहन होत नाही

मला भ्रष्टाचारामुक्त आणि भयमुक्त परळी करायची आहे.  विरोधक हे माफियागिरीला प्रोत्साहन देतात. मी जनतेच्या न्यायालयात स्वच्छ आणि निष्कलंक आहे. जनताही माझ्या सोबत आहे हीच बाब विरोधकांना सहन होत नाही त्यामुळे माझ्या विरोधात अफवातंत्र वापरले जात आहे. खोटे बोल पण रेटून बोल या भूमिकेने ते माझ्या विरोधात अपप्रचार करतात पण जनता त्यांची गुरु आहे. योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवून देते. या निवडणुकीत परळीतील स्वाभिमानी जनता मलाच मताधिक्य देणार आहे असे सांगून त्या म्हणाल्या की, विकासाची चळवळ कायम ठेवून शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी वकिल बांधव आणि भगिनींनी स्वतःही मतदान करावे आणि इतरानांही मतदान करायला सांगुन मला भरभरून आशिर्वाद द्यावेत असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले.
  यावेळी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनीही वकीलांशी संवाद साधला. वकीलांनी चांगल्या नेतृत्वाच्या बाजूने राहुन न्यायाची भूमिका घेऊन ना. पंकजाताई मुंडे यांना साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. 
      यावेळी  परळी वकील संघाचे अध्यक्ष पी.एम.सातभाई, अॅड.उषा दौंड, अॅड.प्रकाश मराठे,अॅड.मिर्झा, अॅड.दिलीप स्वामी, अॅड.नागापूरकर, अॅड. आर.व्ही.गित्ते.अॅड.टि.के.गोलेर अॅड.डि.पी.कडबाने, अॅड.राजेश्वर देशमुख  अॅड.प्रदिप गिराम,अॅड.अरुण पाठक अॅड.जगन्नाथ आंधळे अॅड लक्ष्मण अघाव, अॅड.दत्तात्रय आंधळे,  अॅड.पोतदार, अॅड.संंध्या मुंडे, अॅड.कल्याण सटाले, अॅड.विकास टेकाळे, अॅड.मार्तंड शिंदे, अॅड.लक्ष्मण गित्ते, अॅड.ज्ञानोबा मुंडे,  अॅड.अमोल सोंळके, अॅड.सुभाष गित्ते, अॅड.गजानन पारेकर, अॅड. सायस मुंडे अॅड.सोनिया फड मुंडे, अॅड.प्रल्हाद फड.अॅड.सुनिल सोनपीर, अॅड. लक्ष्मण  फड,  अॅड.वाय.आर.सय्यद. अॅड.इम्रान खान अॅड.राहुल सोळंके अॅड.शेख शफीक अॅड.प्रविण फड अॅड.दिनकर वाघमोडे  अॅड.केशव अघाव.अॅड.रूद्र कराड अॅड.बालाजी कराड आदी  उपस्थित होते.

No comments:

Post a comment