तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

बहादूरवाडी येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश लोहार समाज बांधवही धनुभाऊंना साथ देण्यासाठी पुढे आले
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.10...............विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बहादूरवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. परळी शहरातील लोहार समाज बांधवांनीही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना साथ देण्यासाठी पुढाकार घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. बहादूरवाडी येथील दत्तात्रय मुंडे, पांडुरंग मुंडे, सतिश मुंडे, मदन मुंडे, पांडुरंग मुंडे, धनराज मुंडे, सोमनाथ मुंडे, हनुमंत मुंडे, वैजनाथ मुंडे, परमेश्वर मुंडे, राम वायबसे, सैरव मुंडे, वैजनाथ बिभिषण मुंडे, बालासाहेब मुंडे, गणेश मुंडे, आश्रुबा मुंडे, सुनिल मुंडे, शुभम मुंडे यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी गटनेते वाल्मिकअण्णा कराड, मोहनदादा सोळंके, माणिकभाऊ मुंडे,  दत्तात्रय मुंडे आदी उपस्थित होते. 

लोहार समाजातील कार्यकर्त्यांनीही धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमोल आवाड, प्रथ्वीराज आवाड, विशाल आवाड, ज्ञानेश्वर थोरात, बाबुराव थोरात, बाबासाहेब पोपळघट, बालासाहेब आवाड, राजेभाऊ कसबे, मच्छिंद्र थोरात, बाबासाहेब मनेरे, ऋषिकेश चाफाकानाडे, वैजनाथ आवाड, श्रीनाथ आवाड, जगन्नाथ आवाड, लहुदास आवाड आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रविभैय्या आघाव यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.

No comments:

Post a comment