तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

मतदारसंघ : गंगाखेड विधानसभा चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी ?
अरुणा शर्मा


 पालम :- गंगाखेड विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये विद्यमान आमदार तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार डॉ. मधुसूदन केंद्रे, शिवसेनेचे विशाल कदम, वंचित बहुजन आघाडीच्या करुणा कुंडगीर, रासपचे रत्नाकर गुटे, अपक्ष सीताराम घनदाट, संतोष मुरकुटे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. या ठिकाणी चौरंग लढत होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. सध्या प्रचाराचा जोर वाढला आहे. सभा, कॉर्नर बैठकांवर भर दिला जात असून विविध समाजाच्या बैठका घेऊन पाठिंबा मिळविला जात आहे. तसेच उमेदवारांचे कुटुंब, नातेवाईक प्रचारात उतरले आहेत. विद्यमान आमदार आणि आघाडीचे उमेदवार डॉ. केंद्रे यांच्या समोर सीताराम घनदाट आणि रत्नाकर गुटे यांचे कडवे आव्हान आहे. मराठा, धनगर - हटकर आणि वंजारी या समाजाचे प्राबल्य असून सर्वच समाजाचे उमेदवार उभे राहिल्याने मतविभागणी अटळ मानली जात आहे.
    प्रचारातील महत्वाचे मुद्दे
प्रचारामध्ये विकासापासून कोसोदूर असणारया गंगाखेड विधानसभा मतदासंघातील पालम तालुक्यातील ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न, शहरातील रस्ते, बसस्थानक, आरोग्य सुविधा, ग्रामीण भागातील रस्त्याची झालेली दुरवस्था असे अनेक मुद्दे प्रचारात मांडले जात आहेत. औद्योगीकरणा अभावी रोजगार आणि विकासाची प्रतीक्षा यावर उमेदवारांकडून भर दिला जात आहे.

No comments:

Post a comment