तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ना.पंकजाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती ;

.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात गोपीनाथगड ते भगवानभक्तीगड भव्य रॅलीस व
सावरगावला दसरा मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे- रवि कांदे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
आपली परंपरा आपली प्रथा, भक्तीच्या शक्तीची यशोगाथा, (देश पाहणार भगवान भक्तांचा थाट, सावरगाव घाट......!!) भक्ती आणि शक्तीचा गड म्हणून ओळखल्या जाणार्‍या सावरगाव (ता. पाटोदा ) येथील भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात गोपीनाथगड ते भगवानभक्तीगड भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. मंगळवार दि.08 ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक 6:30 वाजता रॅली निघणार असुन मेळाव्यास व रॅलीस मोठ्या लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे तालुका सरचिटणीस रवि बंकटराव कांदे यांनी केले आहे.
      श्री संत भगवान बाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे पंकजा मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या भगवान भक्ती गडावर यंदाच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडेंसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात गोपीनाथगड ते भगवानभक्तीगड भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. मंगळवार दि.08 ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक 6:30 वाजता रॅली गोपीनाथगड सकाळी 06.30, सिरसाळा सकाळी 7 वाजता, तेलगाव सकाळी 7.20 , वडवणी सकाळी 7.40 वाजता, बीड सकाळी 8 वाजता, वंजारवाडी सकाळी 08.20 वाजता, नायगाव सकाळी 8.40 वा, तांबा राजुरी सकाळी 9 वाजता, चुंबळी फाटा सकाळी 9.20 वाजता, वांजरा फाटा सकाळी 9.30 वाजता, कुसळंब सकाळी 9.45 वाजता, भगवानभक्तिगड सकाळी 10 वाजता ही रॅली पोहोंचणार आहे. भक्ती आणि शक्तीचा गड म्हणून ओळख असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव भगवान भक्ती गडावर भगवान बाबांचे दर्शन घेऊन सीमोल्लंघन साजरे करण्यासाठी तसेच ऊर्जा घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे तालुका सरचिटणीस रवि कांदे यांच्या सह त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

No comments:

Post a comment