तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

भाजप हे दलालाचं सरकार आहे-प्रकाश आंबेडकरप्रकाश आंबेडकर यांची भाजपवर टीका...

वाशिम-विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपचे अमित शहा आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचारसभेत 370 चा मुद्दा घेत आहेत. मात्र या सरकारने 370 कलम रद्द केलं हे कश्मीर मध्ये जमिनी घेण्यासाठी भाजप सरकार दलालाच सरकार असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. वाशिम जिल्ह्यातील तीनही मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वाशिम मध्ये आले असता बोलत होते....
आज देशातील शेतकऱ्यांची चिंता कोणत्याच पक्षाला नाही काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ईडीला घाबरतात तर सेना ही त्यांच्याबरोबर आहे.त्यामुळं हमीभावाबद्दल कुणीच बोलत नाही. शेतकरी संघटनेचे नेते सर्वच मूर्ख असल्याची टीका ही यावेळी आंबेडकर यांनी जाहिरसभेत केलीय...
केंद्रातील वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतींन देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे.त्यामुळं तुम्ही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घ्या असा सल्ला दिला आणि त्यांज घेतलीही मात्र आता वित्त मंत्री बोलतायत की अर्थव्यवस्था मनमोहन सिंग यांच्या काळात ढासळली अशी टीका ही यावेळी आंबेडकर यांनी जाहिरसभेत केलीय.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a comment