तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळीत भव्य पदयात्रा! ; शहराच्या विकासासाठी ना. पंकजाताई मुंडे यांना साथ द्या - खा. डॉ. प्रितमताई मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     परळी नगर पालिका ताब्यात नसतानाही नागरीकांच्या सुविधेसाठी ना. पंकजाताई मुंडे यांनी रस्ते, नाल्या आणि विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे, शहराला नवे रूप देण्याची क्षमता केवळ ना. पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये आहे म्हणून या निवडणुकीत मतदारांनी ना. पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करून विकासासाठी साथ द्यावी असे आवाहन खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी आज केले. शहराच्या विविध भागात त्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 
        परळी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा - शिवसेना - रिपाई - रासप - रयत क्रांती सेना महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पदमावती गल्ली, आनंद नगर, तुळजा नगर, सुभाष चौक आदी भागांत प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन ना. पंकजाताई मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. घरोघरी महिला, पुरूषांनी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे जोरदार स्वागत केले. आम्हाला शांतता आणि सुरक्षितता हवी आहे. विकास तर ना. पंकजाताई करणारच आहेत. त्यामुळे आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत असा विश्वास मतदारांनी दिला. यावेळी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी मतदारांशी संवाद साधून ना. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या विविध कामांची माहिती देऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ना. पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. 
     या प्रचार फेरीत भाजपाचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगरकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन, जेष्ठ नेते दत्ताप्पा ईटके, विकासराव डुबे, वैजनाथ जगतकर, शांतीलाल जैन, पांडुरंग सोनी, अरूण टाक, चैनसुख जाजू, चंद्रकांत समसेट्टी, डॉ. हरिश्चंद्र वंगे, डॉ. दे. घ. मुंडे, डॉ. शालिनीताई कराड, जयश्री गित्ते,  शिवसेनेचे जेष्ठ नेते भाऊराव भोयटे, राजाभाऊ दहिवाळ, संजय कुकडे, उमेश खाडे, राजेंद्र  ओझा, प्रकाश जोशी, वैजनाथ ताटीपामल, माऊली अघाव, राहुल टाक, राम तोष्णीवाल, सुनील चिकाटे, रमेश फुलझळके, बाळू कौलवार, राहुल केंद्रे, राजेश ताटीपामल, सदानंद लोखंडे, श्रीनिवास राऊत, बाळू शहाणे, पुरुषोत्तम दहिवाळ, निलेश राका, बाळासाहेब सुरवसे, मुकेश क्षीरसागर, शुभम सगट, शत्रुघ्न घोडके, आकाश मस्के, विशाल भालेराव, गणेश मस्के, मुन्ना मस्के, आकाश क्षीरसागर, शिवम सुरवसे, मोहन जोशी, नितीन समसेट्टी, प्रितेश तोतला, अनिश अग्रवाल, पवन मोदानी, अरुण साबू, निलेश जाधव, राहुल गोदाम, राहुल घोबाळे, गोविंद चौरे, विजय आवाड, विजय गवळी, बाळासाहेब माने, राहुल लेनेकर, सुनील कांबळे, यशपाल मुंडे, शरण मस्के, अनिल भोकरे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No comments:

Post a comment