तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 31 October 2019

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्या साठी खा पवार परभणी-हिंगाेली जिल्हा दाै-यावरमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची येत्या बुधवारी पाहणी करणार आहेत.

यावर्षी परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

 शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना धीर देण्यासाठी स्वतः पवार साहेब हे येत्या बुधवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी मराठवाड्याचा दौरा करणार आहेत . आपल्या या दौर्यात पवार हे परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे त्यांच्यासोबत या दौर्यात असणार आहेत.

 बुधवार दिनांक 6 रोजी दुपारी बारा वाजता ते सर्वप्रथम सेलू व परिसरातील नुकसानीची पाहणी करतील त्यानंतर परभणी व परिसरातील व त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील वसमत भागातील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

No comments:

Post a comment